गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 20:14 IST2025-10-22T20:07:55+5:302025-10-22T20:14:55+5:30
Uttar Pradesh Crime News: समलैंगिक संबंधांमध्ये राहणाऱ्या दोन पुरुषांमधील एकाने दुसऱ्याच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे घडली आहे. त्यानंतर झालेल्या पीडित मुलीच्या पित्याने आरोपीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून बदला घेण्याचा प्रयत्न केला.

गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
समलैंगिक संबंधांमध्ये राहणाऱ्या दोन पुरुषांमधील एकाने दुसऱ्याच्या सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे घडली आहे. त्यानंतर झालेल्या पीडित मुलीच्या पित्याने आरोपीच्या गुप्तांगावर चाकूने वार करून बदला घेण्याचा प्रयत्न केला. पोलिासांनी आरोपीला ताब्यात घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
ही संतापजनक घटना देवरिया जिल्ह्यातील खुखुन्दू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.या घटनेबाबत मिळालेल्या अधिका माहितीनुसार महाराजगंजमधील रहिवासी असलेला रामबाबू यादव हा मोलमजुरी करतो, तो अविवाहित आहे. त्याचा मित्र ऑर्केस्ट्रामध्ये डान्सरचं काम करतो. तो विवाहित असूनही गेल्या अनेक वर्षांपासून रामबाबूसोबत एकाच घरात पती-पत्नीप्रमाणे राहत होता. त्यांच्यामधील नात्यात रामबाबू हा पती बनला होता.
आरोपीने पोलिसांसमोर समलैंगिक असल्याची बाब स्वीकार केली आहे. तसेच त्याच्या मित्राची पत्नी या दोघांमधील समलैंगिक नात्यामुळे त्यांच्यासोबत राहत नव्हती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची सहा वर्षांची मुलगी वडिलांकडे राहायला आली होती.
दरम्यान, मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामबाबू यादव याने मित्राच्या मुलीवर अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून वडिलांना जाग आली. आपला मित्र मुलीवर जबरदस्ती करत असल्याचे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर त्याने संतापाच्या भरात मित्र रामबाबूच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थली धाव घेतली. पोलिसांनी आरोपी रामबाबू याला ताब्यात घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. आता पोलिसांच्या कडक पाहाऱ्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.