शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नको ते घडले... समलैंगिक पतीचे बिंग ऐन मधुचंद्रावेळी फुटले, दिखाव्यासाठी केले लग्न; पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:39 IST

Crime News: अनेक पुरुषांसोबत समलैंगिक संबंध असतानाही लग्न करून पत्नीची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुचंद्रावेळी पतीचे हे बिंग फुटल्यानंतर पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई :  अनेक पुरुषांसोबत समलैंगिक संबंध असतानाही लग्न करून पत्नीची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुचंद्रावेळी पतीचे हे बिंग फुटल्यानंतर पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित तरुणाचा अटकपूर्व जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ऐरोली सेक्टर ९ येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी वधू-वर सूचक मंडळामार्फत एका उच्चशिक्षित तरुणीसोबत त्याचे लग्न जुळवले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये दोघांचे लग्न झाले असता, ते मधुचंद्रासाठी हिमाचलला गेले होते. यावेळी त्याने वयस्कर व्यक्तीला सोबत घेतले होते. त्यावरून पत्नीला त्याच्या वागण्यावर संशय आला असता त्याने तिची समजूत काढली होती. परंतु त्यानंतरदेखील तो आपल्याऐवजी काही ठराविक मित्रांसोबतच अधिक जवळीक साधत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. यामुळे संधी साधून तिने त्याचा मोबाइल तपासला असता, त्यामध्ये पतीच्या समलैंगिकतेचे बिंग फुटले. पतीचे अनेक पुरुषांसोबत समलैंगिक संबंधाचे फोटो व व्हिडिओ मोबाइलमध्ये आढळले. ही बाब तिने घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकूचा धाक दाखवत तिला गप्प राहण्याची धमकी दिली होती. अखेर तिने समलैंगिक असतानाही १८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची तक्रार रबाळे पोलिसांकडे दिली. 

आरोपी तरुण फरारआरोपी तरुणाने अटक टाळण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला होता. मात्र त्याने केलेले कृत्य किती भयंकर आहे हे, पत्नीच्या वतीने वकील सागर कदम यांनी न्यायालयापुढे मांडले. त्यानुसार न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी त्याचा जामीन रद्द केला आहे. यामुळे त्याची अटक अटळ असल्याने त्याने पळ काढला असून, रबाळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी