Crime News: पब्जी खेळताना मैत्री, त्यानंतर ब्रेकअप, अखेर तरुणीची प्रियकराने केली क्रूरपणे हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 14:53 IST2022-06-11T14:52:37+5:302022-06-11T14:53:37+5:30
Crime News: मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीला ऑनलाईन गेम खेळण्याचा शौक होता.

Crime News: पब्जी खेळताना मैत्री, त्यानंतर ब्रेकअप, अखेर तरुणीची प्रियकराने केली क्रूरपणे हत्या
जयपूर - राजस्थानमधील कोटा शहरामध्ये मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या तरुणीला ऑनलाईन गेम खेळण्याचा शौक होता. पब्जी खेळता खेळता तिची मैत्री गुजरातमधील एका तरुणासोबत झाली. दोघेही जवळ आले. त्यांनी इन्स्टापासून अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी चॅट करू लागले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना भेटण्याचा प्लॅन आखला. यादरम्यान, सदर तरुणी अन्य कुणासोबत फोनवर बोलत असे. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हे भांडण एवढे वाढले की, आरोपी तरुणाने या तरुणीची क्रूरपणे हत्या केली.यादरम्यान, मिळेल्या माहितीनुसार आरोपीने तरुणीला विचारले की, आजकाल तू माझ्याशी कमी बोलते. त्यावर तरुणीने ही बाब नाकारली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सदर तरुणी शिक्षण घेत होती. त्यामुळे तिने अभ्यासाचं कारण देत आरोपीसोबतचं नातं संपुष्टात आणण्याचा विचार बोलून दाखवला.
मात्र आरोपी किशन याला तिच्यावर संशय कोहा. ती अन्य कुणाबरोबर तरी बोलते, असा त्याचा संशय होता. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. अखेरीस या आरोपीने रागाच्या भरात सदर तरुणीची क्रूरपणे हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी गुजरातला पळाला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच आता त्याला कोटा येथे आणण्यात आलं असून, त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.
आता पोलीस विद्यार्थिनीशी बलात्कार आणि हत्येचा आरोपी असलेल्या किशन याला बोराबासच्या जंगलात नेऊन ओळख परेड केली जाणार आहे. दरम्यान, ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावरील तिचा मित्र किशन याने तिची हत्या केली होती. बोराबासच्या जंगलामध्ये या तरुणाने त्याच्या मैत्रिणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. सध्या आरोपी किशन याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनानवी आहे.