Crime News: चारित्र्याच्या संशयावरून आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण, मध्ये पडलेल्या मुलीला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 18:20 IST2021-09-05T18:20:59+5:302021-09-05T18:20:59+5:30
Crime News: कडाक्याच्या भांडणादरम्यान मध्ये आलेल्या मुलीवर रॉकेल टाकून तिला पेटवून देणाऱ्या निर्दयी पित्याला पोलिसांना अटक केली आहे.

Crime News: चारित्र्याच्या संशयावरून आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण, मध्ये पडलेल्या मुलीला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवले आणि...
रायपूर - पती-पत्नीमध्ये झालेल्या कडाक्याच्या भांडणादरम्यान मध्ये आलेल्या मुलीवर रॉकेल टाकून तिला पेटवून देणाऱ्या निर्दयी पित्याला पोलिसांना अटक केली आहे. आरोपीविरोधात पोलिसांनी कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Crime News) ही घटना पोटिया कला येथील आहे. सदर पती त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरूनच त्यांच्यामध्ये वाद झाला, त्यातून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. (The father threw kerosene on the girl and set her on fire)
यादरम्यान, आई-वडिलांचे सुरू असलेले भांडण पाहून सहावीत शिकणारी मुलगी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली. ही बाब संतापलेल्या वडील तीरथ पटेल याला आवडले नाही. त्याने जवळच असलेली रॉकेलची बाटली तिच्यावर ओतली आणि तिला पेटवून दिले.
दरम्यान, यामध्ये सदर मुलगी ८० टक्के भाजली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला पोलिसांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी वडील तीरथ पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधात पुलगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.