Crime News: दोन मुलांच्या पित्याला पत्नीने गर्लंफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, त्यानंतर नको ते घडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:48 IST2022-04-13T15:47:59+5:302022-04-13T15:48:22+5:30
Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या खोलीमध्येच फाशीच्या फंद्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह जप्त करून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Crime News: दोन मुलांच्या पित्याला पत्नीने गर्लंफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, त्यानंतर नको ते घडले
रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा येथे एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या खोलीमध्येच फाशीच्या फंद्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह जप्त करून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये समजले की, विवाहित व्यक्तीचे कुठल्या तरी अन्य महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. एकेदिवशी पत्नीने या दोघांनाही रंगेहात पकडले. प्रेमप्रकरणाचं गुपित उघड झालं तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागला. तसेच झाल्या प्रकारामुळे सदर व्यक्ती खूप खजील झाली होती. त्यानंतर या तरुणाने गेल्या सोमवारी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
कोरबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानिणपूर चौकी क्षेत्रातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे कुठल्यातरी महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, असे सांगण्यात येत आहे. या प्रेमप्रकरणाची कुणकुण त्याच्या पत्नीला लागली. त्यानंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. माणिकपूर चौकी क्षेत्रातील कुआंभट्टा परिसरामध्ये राहणारा सद्दाम हुसेन हा त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. त्याने त्यापूर्वीही एक लग्न केलं होतं. मात्र काही कारणामुळे त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सोडले होते. आता तो त्याच्या दुसऱ्या पत्नीसह राहत होता. दुसऱ्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोमवारी कुटुंबामधील सर्वजण भोजन करून झोपले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा सद्दामची पत्नी झोपून उठली तेव्हा तिला दुसऱ्या खोलीमध्ये पतीचा मृतदेह दिसला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. तेव्हा पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चौकशीमध्ये पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. त्याआधारे पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.