उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पत्नी आणि १८ मुले असलेल्या एका व्यक्तीची प्रेमसंबंधाच्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुलशन ऊर्फ मुन्ना असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनीच ही हत्या केल्याचा आरोप आहे.
गुलशन हा प्रतापगडमधील लालगंज परिसरातील रहिवासी होता. त्याचे वैयक्तिक आयुष्य मोठे रंजक आणि गुंतागुंतीचे होते. त्याला दोन पत्नी असून त्यांच्यापासून त्याला तब्बल १८ मुले आहेत. मात्र, एवढा मोठा परिवार असतानाही गुलशनचे सुमन नावाच्या एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. तो अनेकदा आपल्या कुटुंबाला सोडून तिच्यासोबत राहत असे.
भेटीला बोलावले आणि घात केलापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुमन १८ मार्च रोजी आपल्या माहेरी आली होती. तिने मुन्ना यांना भेटण्यासाठी बोलावले. मुन्ना तिथे पोहोचताच सुमनने आपल्या साथीदारांच्या आणि भावाच्या मदतीने त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुन्ना याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकून दिला.
हत्येचे कारणसुमनच्या कुटुंबीयांना गुलशनसोबतचे तिचे हे संबंध मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात अनेकदा वादही झाले होते. रविवारी रात्री जेव्हा गुलशन तिला भेटायला गेला, तेव्हा तिचे वडील आणि भावांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये गुलशनचा जागीच मृत्यू झाला.
कॉल डिटेलमुळे फुटले बिंगमुन्ना बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मुन्ना यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्यांचे शेवटचे संभाषण सुमनसोबत झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सुमनला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.
दोन पत्नी आणि १८ मुलांचा संसारमृत मुस्तका गुलशन यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत चर्चेत राहिले आहे. त्यांना किस्मतुल निशा आणि अंबिया बानो या दोन पत्नी असून त्या एकाच घरात राहतात. या दोन्ही पत्नींपासून त्यांना प्रत्येकी ९ मुले, असे एकूण १८ मुले आहेत. एवढे असूनही तो २०१६ मध्ये मिश्रपूर गावचा सरपंचही होता.
Web Summary : In Uttar Pradesh, a man with two wives and 18 children was murdered by his lover's family. The motive was disapproval of their relationship. The woman and her accomplices fatally attacked him with an iron rod. Police investigation revealed the crime.
Web Summary : उत्तर प्रदेश में दो पत्नियों और 18 बच्चों वाले एक व्यक्ति की हत्या उसकी प्रेमिका के परिवार ने की। कारण प्रेम संबंध का विरोध था। महिला और उसके साथियों ने लोहे की रॉड से हमला कर उसे मार डाला। पुलिस जांच में अपराध का खुलासा हुआ।