सासऱ्याची सुनेवर वाईट नजर, अनेकदा बलात्काराचा प्रयत्न; वैतागलेल्या मुलाने केली आत्महत्या पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 19:16 IST2021-10-26T19:12:36+5:302021-10-26T19:16:20+5:30
Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासऱ्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे

सासऱ्याची सुनेवर वाईट नजर, अनेकदा बलात्काराचा प्रयत्न; वैतागलेल्या मुलाने केली आत्महत्या पण...
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नोएडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासऱ्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. त्याने कित्येकदा आपल्या मुलाच्या पत्नीची छेड काढली असून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या अशा वागणुकीला वैतागून मुलाने आत्महत्या केली. पण तरी देखील सासऱ्याला काहीच फरक पडला नसून तो अजूनही सुनेने त्रास देत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधील सेक्टर 49 क्षेत्रातील सर्फाबाद गावात ही लज्जास्पद घटना घडली आहे. सुनेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत आपल्या सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर अनेकदा बलात्काराचा प्रयत्न झाला असून फसवणूक झाल्याचं सुनेने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी बृदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनिसार, सोरखा गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं लग्न हे सर्फाबाद गावातील यशपाल नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं.
सासऱ्याची वाईट नजर, अनेकदा काढली छेड
महिलेचा गंभीर आरोप आहे की, तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर असून त्याने अनेकदा छेड काढली आहे. तसेच बलात्काराचा देखील प्रयत्न केला. महिलेने याबाबत आपल्या पतीला देखील माहिती दिली होती. यानंतर पतीने आपल्या वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यांच्यामध्ये पत्नीवरून मोठा वाद देखील झाला. पुढे या वादाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं. पण तरी देखील सासऱ्याने आपलं वागणं बदललं नाही. त्याने सुनेना तसाच त्रास देणं सुरू ठेवलं.
सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. पतीच्या मृत्यूनंतर देखील काही वेळा सासऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला वैतागून महिला माहेरी निघून आली. सासरा सूरज यादव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.