पिताच झाला हैवान! 20 वर्षीय लेकीवर केला बलात्कार; मुलीने लावले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 19:28 IST2022-08-17T19:26:47+5:302022-08-17T19:28:51+5:30

Crime News : पीडित मुलगी आणि तिची आई वडिलांना भेटण्यासाठी महाराजगंज येथे आली होती. मात्र, वडिलांनी मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

Crime News dreadful act with daughter who came to meet father from nainital victim accuses father of sensational rape | पिताच झाला हैवान! 20 वर्षीय लेकीवर केला बलात्कार; मुलीने लावले गंभीर आरोप

पिताच झाला हैवान! 20 वर्षीय लेकीवर केला बलात्कार; मुलीने लावले गंभीर आरोप

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.  महाराजगंज जिल्ह्यात एका मुलीने वडिलांवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिला सहकार्य केले नाही. त्यामुळे तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत वडिलांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज जिल्ह्यातील सिसवामुंशी गावात राहणाऱ्या अली रझा याने दुसरे लग्न केले असून त्याने पहिली पत्नी आणि मुलगी या दोघांना सोडलं आहे. त्याची 20 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत नैनितालमध्ये राहते. पीडित मुलगी आणि तिची आई वडिलांना भेटण्यासाठी महाराजगंज येथे आली होती. मात्र, वडिलांनी मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिला पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्कार केल्यावर हे जर कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले आहे.

पीडित मुलगी आणि तिच्या आईने या घटनेनंतर एसपी डॉ. कौस्तुभ यांची भेट घेतली. तसेच आरोपी वडिलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित मुलगी महाराजगंज जिल्ह्यातील थुठीबारी येथे तिच्या मावशीच्या घरी राहते. पीडितेची आईची तिच्या वडिलांसोबत भेट झाल्यावर  बापाने फसवणूक करून मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. बापाने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी सीओंकडून चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तर या संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणाले की, सीओ या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या पीडितेच्या आरोपानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मात्र, प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Crime News dreadful act with daughter who came to meet father from nainital victim accuses father of sensational rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.