भयंकर! 13 वर्षांच्या मित्राने 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून केली निर्घृण हत्या; 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:50 IST2022-04-06T14:45:38+5:302022-04-06T14:50:55+5:30

Crime News : परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.

Crime News delhis teenager kills his 8 year old friend | भयंकर! 13 वर्षांच्या मित्राने 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून केली निर्घृण हत्या; 'अशी' झाली पोलखोल

भयंकर! 13 वर्षांच्या मित्राने 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून केली निर्घृण हत्या; 'अशी' झाली पोलखोल

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका 8 वर्षांच्या मुलाचं आधी अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्याच्या 13 वर्षांच्या मित्राने त्याची निर्घृण हत्या केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रोहिणी जिल्ह्यातील कांझावाला भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.

पोलिस उपायुक्त प्रणव तायल यांनी एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, '2 एप्रिल रोजी रात्री 9:13 वाजता एका महिलेचा फोन आला की तिचा 8 वर्षांचा मुलगा दुपारी 3 वाजता घरातून बाहेर गेला होता आणि तेव्हापासून तो परतला नाही. तिच्या वक्तव्याच्या आधारे, पोलिसांनी सुरुवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 363 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. 

बेपत्ता मुलाच्या आईने सांगितले की, तिचा आठ वर्षांचा मुलगा त्याच्या 13 वर्षांच्या मित्रासह घरातून निघून गेला होता. पोलिसांनी याप्रकरणी 13 वर्षांच्या किशोरची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलासोबत भांडण करून नंतर दगडाने ठेचून त्याची आपणच निर्घृण हत्या केल्याचं कबूल केलं. तसेच त्याचा मोबाईल घेतल्याचं देखील सांगितलं. 

मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये कलम 302 जोडले आणि मुलाला पकडले. सोहाटी (हरियाणा) गावातील जंगल परिसरातून मुलाचा मृतदेह सापडला आहे. यासोबतच चोरीला गेलेला मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या घटनेने मुलाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News delhis teenager kills his 8 year old friend