Crime News: समन्सवर बनावट सह्या करणाऱ्या महिला पोलिसाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 15:06 IST2022-11-10T15:02:32+5:302022-11-10T15:06:28+5:30
Crime News: समन्स बजावणी अहवालावर बनावट सह्या करणाऱ्या महिला पोलिसाविरूध्द एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: समन्सवर बनावट सह्या करणाऱ्या महिला पोलिसाविरुध्द गुन्हा
- बी.एस. चौधरी
जळगाव - समन्स बजावणी अहवालावर बनावट सह्या करणाऱ्या महिला पोलिसाविरूध्द एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता रोहीदास पाटील असे या गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. कासोदा पोलिस स्टेशन येथे त्या कार्यरत आहेत. सविता पाटील यांनी समन्स बजावणी अहवालावर साक्षीदार म्हणून पोलिस शिपाई जितेश संजय पाटील, महादू संतोष पाटील, पंच नितिन वसंतराव पवार (रा. कासोदा) या तिघांच्या परस्पर सह्या केल्या.
एरंडोल दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक अधिक्षक अनिल नारायण पाटील यांनी याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार महिला पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत.