Crime News: बंटी-बबलीने मारला ४२ तोळ्यांवर डल्ला, गोव्यातून महिलेला अटक, तर साथीदार फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 05:00 IST2022-04-08T05:00:18+5:302022-04-08T05:00:37+5:30

Crime News: मैत्रिणीचा विश्वासघात करून तिच्या घरात ठेवलेले ६ लाख ८३ हजारांचे ४२ तोळे सोने व ९० हजारांची रोख रक्कम अशा ७ लाख ७३ हजार रुपयांची चोरी करून पळून गेलेल्या बंटी-बबलीला नारपोली पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Crime News: Bunty-Babli theft 42 Tola Gold, arrests woman from Goa, accomplice absconds | Crime News: बंटी-बबलीने मारला ४२ तोळ्यांवर डल्ला, गोव्यातून महिलेला अटक, तर साथीदार फरार

Crime News: बंटी-बबलीने मारला ४२ तोळ्यांवर डल्ला, गोव्यातून महिलेला अटक, तर साथीदार फरार

 भिवंडी :  मैत्रिणीचा विश्वासघात करून तिच्या घरात ठेवलेले ६ लाख ८३ हजारांचे ४२ तोळे सोने व ९० हजारांची रोख रक्कम अशा ७ लाख ७३ हजार रुपयांची चोरी करून पळून गेलेल्या बंटी-बबलीला नारपोली पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मोनालीशा पंकज रॉय असे अटक केलेल्या ‘बबली’चे नाव असून, तिच्यासोबत  लिव्ह ॲण्ड रिलेशनमध्ये राहणारा ‘बंटी’ प्रेमचंद भारती हा फरार आहे.

कशेळी येथील एका इमारतीत दिशा रवींद्र लखाणी या वास्तव्याला असून, त्यांची मैत्रीण मोनालीशा व तिचा पती प्रेमचंद हे फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी येऊन पाच दिवस राहिले. यादरम्यान एका रात्री चौघांनी पार्टी करून मद्यसेवन केले असता, त्याचा फायदा घेत या बंटी-बबलीने दिशा यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करून दुसऱ्या दिवशी पळ काढला. आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

नारपोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ व गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास केला असता, यातील आरोपी हे गोव्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोनालीशाला ताब्यात घेतले असून फरार झालेल्या प्रेमचंद याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिऱ्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Crime News: Bunty-Babli theft 42 Tola Gold, arrests woman from Goa, accomplice absconds

टॅग्स :Goldसोनं