भयंकर! "तिच्याशिवाय मी कसा जगू?"; प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 12:35 IST2022-02-28T12:34:08+5:302022-02-28T12:35:34+5:30

Crime News : प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या बाराव्यालाच बॉयफ्रेंडने स्वत:ला संपवलं आणि लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे.

Crime News boyfriend commits suicide 12 days after girlfriend death in etah | भयंकर! "तिच्याशिवाय मी कसा जगू?"; प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

भयंकर! "तिच्याशिवाय मी कसा जगू?"; प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. कधी कधी याच प्रेमातून अनेक धक्कादायक घटना देखील घडतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर 12 दिवसांनी प्रियकराने टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या बाराव्यालाच बॉयफ्रेंडने स्वत:ला संपवलं आणि लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट झाला आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

ज्या दिवशी प्रेयसीचं बारावं होतं, त्याच दिवशी प्रियकराचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकर खूप दु:खी झाला होता. त्याच निराशेतून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील लिंगज पोलीस ठाणे हद्दीतील अमरोली गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. 

12 दिवसांपूर्वी या तरुणाच्या प्रेयसीने आत्महत्या करून स्वत:च जीवन संपवलं होतं. प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकराला खूप मोठा धक्का बसला होता. प्रेयसीच्या मृत्यूच्या दु:खात तरुणाने हे भयावह पाऊल उचलल्याची शक्यता आहे. "ती आता या जगात नाही. तिच्याशिवाय मी कसा जिवंत राहू" असं नेहमी तरुण म्हणायचा. त्याच्या कुटुंबाने त्याची खूप समजून काढली पण तो ऐकायलाच तयार नव्हता. 

तरुणाच्या मृत्यूची सूचना मिळताच त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस तपास करीत आहे. पोलिसांकडून आत्महत्येशिवाय हत्येच्या पैलूनेही तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News boyfriend commits suicide 12 days after girlfriend death in etah