Crime News: घरात सापडले आई आणि चार मुलांचे मृतदेह, धक्कादायक घटनेमुळे दिल्लीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:08 IST2022-01-19T17:08:00+5:302022-01-19T17:08:31+5:30
Crime News: राजधानी दिल्लीतील सीमापुरी भागात घरामध्ये महिला आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

Crime News: घरात सापडले आई आणि चार मुलांचे मृतदेह, धक्कादायक घटनेमुळे दिल्लीत खळबळ
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील सीमापुरी भागात घरामध्ये महिला आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच सदर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर घटना शाहदरा येथील सीमापुरी भागात घडली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह हे घराच्या आत मिळाले आहेत.
शाहदराच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, आज सुमारे १३.३०च्या दरम्यान, एका पीसीआर कॉलच्या माध्यमातून जुन्या सीमापुरी भागातील घर नंबर ५७ मध्ये ४-५ लोक बेशुद्धावस्थेत पडले होते. तिथे स्थानिक पोलीस पोहोचले. या घरातील पाचव्या मजल्यावर केवळ एक खोली आहे. तिथे तीन मुले आणि एक महिला मृतावस्थेत सापडली. तसेच खोलीमध्ये धुराचा वासही दिसून आला. स्थानिकांकडे केलेल्या चौकशीमधून समजले की, मोहित कालिया (३५ वर्षे) यांचंयासोबत पत्नी राधा (३० वर्षे) आणि त्यांची चार मुले (दोन मुली आणि दोन मुलगे) राहत होते. त्यांची पत्नी आणि ३ मुले खोलीमध्ये मृतावस्थेत सापडली. तर चौथ्या मुलाला वडिलांनी रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. हा फ्लॅट एक दिवसापूर्वी शालिमार गार्डनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडून त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला केला होता.
घटनास्थळावर क्राइम टिम, एफएसएल आणि फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले आहे. प्राथमिक तपासामध्ये थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या अंगीठीच्या वापरामुळे गुदमरून या सर्वांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका लहानशा खोलीमध्ये हे सर्वजण राहत होते. तसेच खोलीमध्ये कुठलेही व्हेंटिलेशन नव्हते.