Crime News: भाजपाच्या नेत्याला महिलेने हनिट्रॅपमध्ये अडकवले, असा रचला कट, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 10:55 IST2022-04-04T10:54:36+5:302022-04-04T10:55:06+5:30
honeytrap, Crime News: हिमाचल प्रदेशमधील एका महिलेने हरियाणातील भाजपाच्या एका बड्या नेत्याला हनिट्रॅपमध्ये अडकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण हरियाणामधील यमुनानगर जिल्ह्यातील आहे.

Crime News: भाजपाच्या नेत्याला महिलेने हनिट्रॅपमध्ये अडकवले, असा रचला कट, अखेर...
चंडीगड - हिमाचल प्रदेशमधील एका महिलेने हरियाणातील भाजपाच्या एका बड्या नेत्याला हनिट्रॅपमध्ये अडकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण हरियाणामधील यमुनानगर जिल्ह्यातील आहे. येथे भाजपाच्या बिलासपूर मंडळाचे मंत्री दीपक भारद्वाज यांना ब्लॅकमेल केले जात आहे. या ब्लॅकमेलिंगचा आरोप हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील जसोरगड येथील एक महिला आणि इतर पाच लोकांवर लागला आहे. हे आरोपी खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत होते. अखेर त्रस्त होऊन त्याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार दीपक भारद्वाज यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील कालाआंब स्थित रिसॉर्टचे मॅनेजर आणि जसोरगडचे निवासी राजेश ठाकूर यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. त्यामुळे राजेश ठाकूर यांच्याकडे त्यांचे येणेजाणे होते. तसेच त्यातून त्यांची राजेश ठाकूर यांच्याशी मैत्री झाली. काही काळाने राजेश ठाकूर यांनी त्यांची भेट उमा ठाकूर नावाच्या महिलेशी घालून दिली.
पीडित व्यक्तीने सांगितले की, रिसॉर्टचे मॅनेजर राजेश ठाकूर यांनी त्याला सांगितले की, ही महिला विवाहित आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने ती .येथे पांवटा साहिबमध्ये त्याच्या जवळ राहत आहे. त्यानंतर मीसुद्धा किच्याशी बोलू लागलो. आमचे मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. तसेच मी नेहमी फोनवर तिच्यासोबत बोलत असे. सुमारे दोन वर्षांपर्यंत असे सुरू होते.
दरम्यान, आता राजेश ठाकूर, त्यांचा सहकारी यश ठाकूर, धर्मेंद्र नेगी आणि संतोष महाजन तसेच उमा ठाकूर हे मला ब्लॅकमेल करण्याची धमकी देत आहेत. तीन चार महिन्यांपासून फोनच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे. आरोप आहे की उमा ठाकूरकडून इंटरनेटवर रिया शर्मा या नावाने खोटे आयडी तयार करून त्यांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. आता आरोपी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. पैसे न दिल्याने त्यांच्या पत्नीलाही धमकी देत आहेत.