धक्कादायक! पॉर्न पाहून सुरू केली 'वाईफ स्वॅपिंग सर्व्हिस'; पत्नीलाही भाग पाडलं, Video बनवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 14:52 IST2022-02-06T14:45:15+5:302022-02-06T14:52:40+5:30
Crime News : एका 28 वर्षीय सेल्समनला अटक केली आहे. इंटरनेटवर ऑनलाईन 'वाईफ स्वॅपिंग सर्व्हिस' केल्याबद्दल अटक करण्यात आली.

धक्कादायक! पॉर्न पाहून सुरू केली 'वाईफ स्वॅपिंग सर्व्हिस'; पत्नीलाही भाग पाडलं, Video बनवला अन्...
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी एका 28 वर्षीय सेल्समनला अटक केली आहे. इंटरनेटवर ऑनलाईन 'वाईफ स्वॅपिंग सर्व्हिस' केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व विभागातील सायबर क्राईम पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विनय (28) याला अटक केली. तपासादरम्यान या जोडप्याच्या घरातून पोलिसांनी काही गॅजेट्स जप्त केले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पॉर्न पाहायचं व्यसन लागलं होतं. तो त्याच्या आहारी गेला होता आणि म्हणूनच त्याने पत्नीला देखील पॉर्न व्हिडीओ पाहण्यासाठी भाग पाडलं. दक्षिण पूर्व डीसीपी श्रीनाथ महादेव जोशी यांनी विनय ट्विटरवर वाईफ स्वॅपिंगबद्दल मेसेज टाकत असे. ग्राहकांशी संपर्क साधला असता, तो त्यांना पुढील कार्यवाहीसाठी टेलिग्रामवरील आयडीवर मेसेज करायचा. जर त्यांनी सहमती दर्शवली तर तो त्यांना घरी बोलवायचा असं सांगितलं आहे.
तरुणाने कथितपणे लोकांशी संपर्क साधण्यासाठी एका महिलेच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट तयार केले. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनय विवाहित असून त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. विनयला पॉर्नोग्राफीचे व्यसन होतं आणि तो त्याच्या पत्नीलाही पॉर्न पाहण्यास भाग पाडत असे. त्याने वाईफ-स्वॅपिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे क्लायंट इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील त्याच्या घरी यायचे, जिथे ते व्हिडीओ देखील बनवायचे. पुढील तपासासाठी पोलिसांनी या जोडप्याचे फोन ताब्यात घेतले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.