शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Crime News : बँकेचा सुरक्षारक्षकच ४ कोटी घेऊन फरार, पोलिसांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 6:07 AM

Crime News: पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यात सुनील बँकेच्या आत जाऊन थोड्या वेळाने बाहेर येत होता, असे वारंवार झाल्याचे दिसते.

- बलवंत तक्षक

चंदीगड : ॲक्सिस बँकेच्या येथील (सेक्टर ३१) मुख्य शाखेचा मुख्य सुरक्षारक्षक सुनील हा ४.०४ कोटी रुपये घेऊन पळून गेला आहे. तीन वर्षांपासून तो बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्याने पंजाबमधील मोहाली आणि हरयाणाताल मोरनी येथील पत्ते दिले होते. त्याला पकडण्याच्या मोहिमेवर पोलीस असले तरी त्याने त्याचा मोबाइल बंद करून ठेवला आहे.पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यात सुनील बँकेच्या आत जाऊन थोड्या वेळाने बाहेर येत होता, असे वारंवार झाल्याचे दिसते. तो बाहेर येऊन शर्टच्या आत लपवलेल्या नोटांची बंडले कोण्या परिचिताला देत होता किंवा कोणत्या तरी वाहनात ठेवत होता, असे पोलिसांना वाटते.  हे घडत होते तेव्हा पंजाब पोलिसांचे तीन जवानही तेथे कर्तव्यावर होते; परंतु त्यांनाही या गोष्टीचा पत्ता लागला नाही. रात्री जवळपास तीन वाजता सुनील गायब झाल्यावर पोलिसांच्या जवानांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी तेथे ठेवलेल्या खोक्यांची तपासणी केली तेव्हा कटरने कुलूप तोडून त्यात ठेवलेली रक्कम काढल्याचे दिसले. हिशेब केल्यावर सुनीलने ४.०४ कोटी रुपये घेऊन पळ काढला, असे स्पष्ट झाले.

पोलिसांची पथके स्थापनचंदीगडच्या पोलीस अधीक्षक (दक्षिण) श्रुती अरोरा यांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले आहेत, असे सांगितले. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधले जात आहे. त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास अरोरा यांनी व्यक्त केला.

अनेक राज्यांत या शाखेतून जायचा पैसाॲक्सिस बँकेच्या या शाखेतून चंदीगडशिवाय पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या शाखांतही पैसा पाठवला जायचा. या शाखेत प्रत्येक वेळी कोट्यवधी रुपये रोख असायचे. मुख्य सुरक्षा कर्मचारीच एका दिवशी कोट्यवधी रुपये घेऊन निघून जाईल, असा संशयही बँक अधिकाऱ्यांना आला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbankबँक