दोन कुटुंबांत राडा! वर्ध्याच्या पळसगावात दोघांवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 18:22 IST2022-08-04T18:15:08+5:302022-08-04T18:22:53+5:30

चैतन्य जोशी वर्धा - दारुच्या कारणातून झालेल्या वादात दोन कुटुंबात चांगलाच राडा झाला. दरम्यान, एका कुटुंबातील दोन युवकांच्या पाठीवर ...

Crime News attack on two People in Palasgaon of Wardha | दोन कुटुंबांत राडा! वर्ध्याच्या पळसगावात दोघांवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

दोन कुटुंबांत राडा! वर्ध्याच्या पळसगावात दोघांवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं?

चैतन्य जोशी

वर्धा - दारुच्या कारणातून झालेल्या वादात दोन कुटुंबात चांगलाच राडा झाला. दरम्यान, एका कुटुंबातील दोन युवकांच्या पाठीवर आणि छातीवर चाकूने मारहाण करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या कुटुंबातील एकाला चाकूने मारहाण करीत जखमी केले. ही घटना पळसगाव येथे घडली असून, याप्रकरणी ३ रोजी देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. 

पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पहिल्या तक्रारीनुसार आकाश कौरती, सालोडकर, गणेश उईके, अनिल भलावी यांनी प्रशांत बाजारे आणि वैभव बाजारे यांच्या छातीवर आणि पाठीवर चाकूने मारहाण करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जगदीश तुळशीदास बाजारे यांनी पोलिसात तक्रार दिली. 

मंगेश उर्फ गणेश लक्ष्मण उईके यांच्या तक्रारीनुसार त्याने वैभव बाजारे याला तू गावातील लहान मुलांना दारू देऊ नकोस, असे म्हटले असता वैभव बाजारे, वानखेडे, प्रशांत घेही यांनी मंगेश याच्याशी वाद करुन त्याला काठीने व चाकूने मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
 

Web Title: Crime News attack on two People in Palasgaon of Wardha