Crime News:महिलेला निर्वस्त्र करून पती, मुलांसमोरच केला सामुहिक बलात्कार, राजस्थानमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 23:05 IST2022-03-17T22:45:49+5:302022-03-17T23:05:58+5:30
Crime News: काही नराधमांनी एका महिलेवर मानवतेच्या सर्व मर्यादा पार करत तिला निर्वस्त्र केले. त्यानंतर तिच्यावर पती आणि मुलासमोरच सामुहिक बलात्कार केला. मग तिला बेदम मारहाण करून तिथून फरार झाले.

Crime News:महिलेला निर्वस्त्र करून पती, मुलांसमोरच केला सामुहिक बलात्कार, राजस्थानमधील संतापजनक घटना
जयपूर - राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील कंचनपूर ठाण्याच्या क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही नराधमांनी एका मागासवर्गीय महिलेवर मानवतेच्या सर्व मर्यादा पार करत तिला निर्वस्त्र केले. त्यानंतर तिच्यावर पती आणि मुलासमोरच सामुहिक बलात्कार केला. मग तिला बेदम मारहाण करून तिथून फरार झाले.
पीडितेने याबाबत अर्धा डझन लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर सामुहिक बलात्कार आणि मारहाणीसह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्यापतरी हे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली होती. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगितले की, ती १५ मार्च रोजी संध्याकाळी सुमारे सहा वाजता शेतातून काम करून घरी परतत होती. मात्र रस्त्यातच काही गावगुंडांनी त्यांचा रस्ता अडवला. आदी त्यांनी हत्यारांचा धाक दाखवत पतीला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर पती आणि मुलांसमोरच सामुहिक बलात्कार केला.
या घटनेचा पीडिता आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तिच्या तक्रारीनंतर तपास सुरू झाला आहे. दरम्यान, या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी विजय कुमार सिंह यांनी सांगितले.