शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Crime News : सलग १८ तास ‘त्या’ हैवानांची शिकार ठरली अल्पवयीन मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 06:59 IST

एका पोलीस मित्राचाही समावेश.

पालघर : माहीम येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यालगत एका पडक्या बंगल्यात नेऊन १७ ते १८ तास आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या आठ आरोपींना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका पोलीस मित्राचाही समावेश आहे. ही सर्व आरोपी मुले २० ते ३० वयोगटातील असून त्यांच्याविरोधात  पोक्सोअंतर्गत बलात्कार, अपहरण आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

माहीम येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला शुक्रवारी संध्याकाळी ६-७ वाजण्याच्या सुमारास तिच्या एका मित्राने बोलावून घेतले. त्यानंतर त्या मुलीला समुद्रकिनाऱ्यालगत निर्जन स्थानी अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या पडक्या बंगल्यात नेण्यात आले. या वेळी आपल्या संपर्कातील अनेक मित्रांना  फोन करून बोलावून घेतले. या वेळी त्या अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरोधात सुमारे १८ तास अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. तिने आपल्या घरच्यांशी संपर्क साधू नये म्हणून तिचा मोबाइल हिसकावून घेण्यात आला, असे पोलिसांचे म्हणणे असले तरी आपले पैशांसाठी अपहरण करण्यात आल्याचा फोन तिने आपल्या पालकांना केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी याला दुजोरा दिला असून, हा फोन आल्यानंतर तिच्या बहिणीने शोध घेण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला होता, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी सातपाटी सागरी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. एका अल्पवयीन मुलीबाबत घडलेल्या प्रकाराने ताळ्यावर आलेल्या पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना तिचा मोबाइल नंबर ट्रेस केल्यावर ही मुलगी माहीम-हरणवाडी दरम्यान दुपारी सापडली. या वेळी मरणासन्न अवस्थेत ती रस्त्याकडेला होती. मुंबईत उपचारया मुलीला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी करीत आहेत.

मदतीसाठी विचारले आणि अडकला

  • त्या मुलीने दिलेल्या जबानीनंतर पोलिसांनी तत्काळ तीन स्थानिक मुलांना अटक केली. 
  • याच वेळी आपल्या कारमधून आलेल्या एका पोलीस मित्र म्हणवणाऱ्या स्थानिक तरुणाने पोलिसांना हाक मारीत काही मदत करू शकतो का? अशी इच्छा प्रदर्शित करीत असताना आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांत हाही मुलगा असल्याचे त्या मुलीने सांगितल्यावर पोलिसांनी आपल्याच ‘मित्राला’ तत्काळ अटक केली. 
  • त्यानंतर पोलिसांनी एकूण आठ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात पोक्सो, बलात्कार आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या तरुणांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. त्यांना अमली पदार्थ नेमके कोठून मिळाले, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी