शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 13:00 IST

Crime News 6 lakh rupees cheated online from doctor : एका डॉक्टरला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने तब्बल सहा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये सिम व्हेरिफेकशनच्या नावाने एका डॉक्टरची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. फक्त 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. हा भयंकर प्रकार लक्षात येताच डॉक्टरने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका डॉक्टरला सिम व्हेरिफिकेशनच्या नावाने तब्बल सहा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्रिमिनल्सने रिटायर्ड डॉक्टर अंबिका प्रसाद द्विवेदी यांवर निशाणा साधून त्यांची मोठी फसवणूक केली आहे. 18 जुलै रोजी फ्रॉड करणाऱ्यांनी डॉक्टरांना कॉल करुन त्यांचं सिम कार्ड व्हेरिफाय करण्याबाबत माहिती दिली. सिम कार्ड व्हेरिफाय न केल्यास, 24 तासांच्या आतमध्ये सिम बंद होणार असल्याची खोटी माहिती त्यांना दिली. तसेच सिम व्हेरिफिकेशनच्या नावाखाली 11 रुपये नेट बँकिंगद्वारे मागितले. डॉक्टरांनी जाळ्यात अडकून आपल्या SBI खात्यातून 11 रुपये ट्रान्सफर केले.

पैसे ट्रान्सफर केल्याच्या काही वेळातच डॉक्टरांच्या मोबाईलवर एका मागोमाग एक पैसे कट झाल्याचे 15 मेसेज आले. या मेसेजमधून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 6 लाख 423 रुपये उडाल्याचं समजलं. डॉक्टरांनी बँकेत जाऊन संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि पोलिसांतही तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ज्या नंबरवरुन डॉक्टरांना कॉल आला होता, त्या फोनचं लोकेशन झारखंडमधील असल्याचं समोर आलं. लोकेशननुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

आरोपींनाही पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपलं लोकेशन बदलण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी एका ठिकाणी छापेमारी करत स्कॉर्पियो कार ताब्यात घेतली आहे. या गाडीत एक मोबाईल मिळाला असून याच मोबाईलवरुन त्यांनी डॉक्टरांना कॉल केला होता. या मोबाईलमधील सिम कार्डच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच ताब्यात घेततलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरfraudधोकेबाजीIndiaभारतMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMONEYपैसा