माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:16 PM2022-08-16T19:16:10+5:302022-08-16T19:23:41+5:30

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

Crime News 3 dead engaged in interrogation by taking accused mother into custody | माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

Next

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे विकोपाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यावर तिने आपल्या तीन मुलांना विष पाजून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर महिलेने कोणताच विचार न करता रागाच्या भरात तिच्या तीन मुलांना विष पाजले. विष प्यायल्यानंतर तिन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि मुलांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी महिलेचं पती आणि दिरासोबत मोबाईलवर वाद झाला. यामुळे महिलेला राग आला आणि तिने तिची दोन मुलं हिमांशू (11), प्रियांशु (8) आणि मुलगी सुप्रिया (7) यांची हत्या केली. दुपारी चार वाजता त्यांना चहामध्ये विष मिसळून दिलं. मुलांची प्रकृती बिघडायला लागल्यावर महिलेने याबाबत माहिती दिली. 

घरातील लोकांनी मुलांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हिमांशू आणि सुप्रियाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. पण नंतर उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. महिलेला चार मुलं आहेत. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा चौथा मुलगा हा बाहेर गेला होता. त्यामुळे तो वाचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Crime News 3 dead engaged in interrogation by taking accused mother into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.