शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

मेहुण्याने घातला कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:41 AM

वयाच्या ५०व्या वर्षी व्यावसायिकाने एका विवाहित महिलेशी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांतच कर्ज न फेडल्याने मेहुण्याच्या घरावर जप्तीचे आदेश आले.

मुंंबई - वयाच्या ५०व्या वर्षी व्यावसायिकाने एका विवाहित महिलेशी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांतच कर्ज न फेडल्याने मेहुण्याच्या घरावर जप्तीचे आदेश आले. मेहुण्याने ते घर विकत घेण्याचा सल्ला व्यापाऱ्याला दिला. व्यापाºयानेही पत्नीचाच भाऊ असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून पुढाकार घेतला. मात्र, याच विश्वासात त्यांची पावणेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मेहुण्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मालाड परिसरात व्यावसायिक राजेंद्र ठक्कर (५१) राहण्यास आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लीनासोबत विवाह केला. लीना यांना पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ते दोघेही ठक्कर यांच्यासोबत राहतात.मालाड परिसरातच लीना यांचा भाऊ तेजस जितेंद्र राजा व त्याची पत्नी जागृती राजा राहण्यास आहे. लग्नानंतर दोघांची घरी ये-जा सुरू झाली. त्याचा विदेशातून खेळणी आयात निर्यातीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायासाठी त्याने बँकेकडून २०१५ मध्ये अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात घर गहाण ठेवले. मात्र, व्यवसायात तोटा झाल्याने त्याने कर्ज घेतल्यापासून एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे त्याच्या घरावर बँकेने जप्तीचे आदेश काढले.दोघांनी मदतीसाठी ठक्कर यांच्याकडे धाव घेतली. त्यांना याबाबत सांगून पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला. तेजसने त्यांना तो फ्लॅट विकत घेण्यास सांगितले. तो विकत घेतल्यास त्याचा ताबा तुमच्याकडे राहील आणि बदनामी होणार नाही. ठक्कर यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि फ्लॅट विकत घेण्यासाठी तयारी दर्शविली.त्यांनी बँकेत विचारणा केली, तेव्हा तेजस यांना बँकेने ३ कोटी ३० लाख रुपयांचा हप्ता भरणे बाकी असल्याचे सांगितले. मात्र, २ कोटी ६५ लाखांत फ्लॅट बँकेकडून विकत घेऊ शकतो, असे सांगून तेवढे पैसे भरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी डिसेंबर २०१७ पासून २८ मार्चपर्यंत २ कोटी ७९ लाख रुपये भरले. करारानुसार, घराचा ताबा मिळाल्यानंतर उर्वरित १४ लाख आणि घर ठक्कर यांच्या नावावर करण्यात येईल, असे मेहुण्याने सांगितले होते. मात्र, त्याने घराचा ताबा न देता शिवीगाळ करत हकलून लावले.अखेर यामध्ये आपली फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी मेहुण्यांसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक केली नसल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडीस यांनी दिली.बँकेचे थकविले होते कर्जव्यवसायासाठी मेहुण्याने अडीच कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, एकही हप्ता न भरल्याने बँकेने घरावर जप्तीचे आदेश काढले.त्याने भावोजींना आपले घर विकत घेण्यास सांगितले. ठक्कर यांनीही विश्वासठेवत घर विकत घेण्यासाठी तयारी दर्शविली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबई