Father killed three children: एका व्यक्तीने आपल्या पाच मुलांना दोरीने गळफास लावला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. यात तीन मुलींचा मृत्यू झाला असून, सुदैवाने दोन मुले वाचली आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मिश्रोलिया गावातील वार्ड क्रमांक चारमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. अमरनाथ राम असे तीन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे.
मध्यरात्री मुलांना गळफास लावला
अमरनाथ राम हे तीन मुली आणि दोन लहान मुलांसह राहत होते. १ वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. अमरनाथ रामने अनुराधा, शिवानी आणि राधिका या तीन मुली आणि शिवम आणि अभिराज यांना दोरीने फास लावून लटकावले. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.
ओरडण्याच्या आवाजामुळे वाचला दोघांचा जीव
रात्रीच्या सुमारास अमरनाथ रामने मुलांना गळफास लावला. यावेळी मुलांनी आरडाओरड केली. घरातून येत असलेल्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक घरात गेले. त्यांना घरात अमरनाथ आणि मुले लटकलेल्या अवस्थेत दिसले.
नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. सकरा पोलीस ठाण्याचे पथक आले. त्यानंतर घटना संपूर्ण गावात पसरली आणि गाव हादरले. पोलीस येईपर्यंत अमरनाथ राम आणि तीन मुलींचा मृत्यू झाला होता. तर दोन मुलांना वाचवण्यात यश आले. दोन्ही मुले गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गावातील लोकांनी पोलिसांना सांगितले की, अमरनाथच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यानंतर तो आपल्या पाच मुलांसह राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे त्रस्त होता. या प्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत.
Web Summary : In Bihar, a father hanged his five children, then himself. Three daughters died, but two sons survived. Financial struggles are suspected as the motive.
Web Summary : बिहार में, एक पिता ने अपने पांच बच्चों को फांसी दी, फिर खुद को फांसी लगा ली। तीन बेटियों की मौत हो गई, लेकिन दो बेटे बच गए। आर्थिक तंगी को आत्महत्या का कारण माना जा रहा है।