Crime in case of stockpiling of unauthorized chemicals at Tarapur; Police action | तारापूर येथील अनधिकृत रसायनाच्या साठ्याप्रकरणी गुन्हा; पोलिसांची कारवाई

तारापूर येथील अनधिकृत रसायनाच्या साठ्याप्रकरणी गुन्हा; पोलिसांची कारवाई

बोईसर : तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रातील वेंगणी गावात अनधिकृतपणे केलेल्या रसायनाच्या साठ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी पाठविलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत सदर साठ्यात मिक्स सॉलवंट व ज्वालाग्रही रसायन असल्याचे समोर आले होते.

तारापूरजवळील वेंगणी गावातील एका शेतात १९ जून रोजी सकाळी एका ट्रकमधून रसायन भरलेले २०० लिटर क्षमतेचे पिंप उतरवले जात असल्याची माहिती नागरिकांनी तारापूर पोलिसांना दिल्यानंतर तारापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर विभागाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना सदर साठ्यातील रसायनांचे नमुने घेऊन तपासणी करण्यासंदर्भात पत्र दिले होते.

दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी पालघर पोलीस अधीक्षक यांना घटनास्थळी भेट देऊन सदरच्या अनधिकृत कृतीबाबत गुन्हा दाखल करण्याबाबत व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी या ठिकाणी संयुक्तरीत्या भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी दिले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील अधिकाºयांनी वेंगणी येथील रसायनांचे नमुने घेऊन तपासणी केली. त्यामध्ये मिक्स सॉलव्हंट असून एक घटक हा अतिज्वालाग्राही असल्याचे तसेच त्याच्या वाफा हवेपेक्षा जड असल्याचे समोर आले होते. हा साठा एमआयडीसी हद्दीच्या बाहेर अधिसूचित नसलेल्या प्लॉटवर केलेला असून याकरिता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले होते.

Web Title: Crime in case of stockpiling of unauthorized chemicals at Tarapur; Police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.