तेरा दिवसांच्या भाचीच्या खूनप्रकरणी मामावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:32 IST2020-08-31T00:32:42+5:302020-08-31T00:32:56+5:30

चाकूर तालुक्यातील झरी बु़ येथील मामाने तेरा दिवसांची भाची सतत रडत असल्याने तिला घरातील पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.

Crime against uncle in murder of 13-day-old niece | तेरा दिवसांच्या भाचीच्या खूनप्रकरणी मामावर गुन्हा

तेरा दिवसांच्या भाचीच्या खूनप्रकरणी मामावर गुन्हा

लातूर - चाकूर तालुक्यातील झरी बु़ येथील मामाने तेरा दिवसांची भाची सतत रडत असल्याने तिला घरातील पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. याप्रकरणी रविवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील झरी (बु़) येथील पुजा हिचा विवाह तालुक्यातील हुडगेवाडी येथील विनोद काळे यांच्याशी झाला होता. पूजा ही बाळंतपणासाठी माहेरी आली होती. तेरा दिवसांपूर्वी तिला मुलगी झाली होती. शनिवारी सकाळी ही नवजात मुलगी अचानकपणे घरातून गायब झाल्याने तिचा शोध घेतला़ तेव्हा तिचा घरातील पायºयाखालील एका पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सुरुवातीस आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, पोहेकॉ. जगन्नाथ भंडे यांनी तपास सुरु करुन मुलीचा माता आरोपी कृष्णा अंकुश शिंदे (रा. झरी बु.) याच्याविरुध्द कलम ३०२ भादविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

Web Title: Crime against uncle in murder of 13-day-old niece