शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एसपींचा फोटो डीपीवर ठेऊन पैसे मागणाऱ्या दोन भामट्यांवर गुन्हा

By संजय तिपाले | Updated: August 21, 2022 11:02 IST

वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तक्रारी वाढत असताना १९ ऑगस्ट रोजी खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याचा अनुभव आला.

बीड: पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा फोटो व्हाट्सअप डीपीवर ठेऊन ते असल्याचे भासवत चॅटिंग करून पैशांची मागणी करणाऱ्या दोन भामट्यांवर अखेर २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तक्रारी वाढत असताना १९ ऑगस्ट रोजी खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याचा अनुभव आला. त्यांचा फोटो स्वतःच्या व्हॉटस्अप डीपीला ठेऊन भामट्यांनी नंदकुमार ठाकूर असल्याचे भासवून संपर्क यादीतील लोकांशी चॅटिंग केली. नंतर पैशांची मागणी करत अमेझॉन पे गिफ्ट कार्ड्स प्रत्येकी १० हजार २० पीस खरेदी करा असा संदेश धाडला.

हॅकरने थेट पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली होती. मित्रयादीतील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना संपर्क साधून याबाबतची माहिती कळविल्यावर ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माझ्या फोटोचा वापर करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये, दुर्लक्ष करावे, अशी सूचना केली होती. शिवाय गंभीर दखल घेत गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक कैलास भारती यांनी नंदकुमार ठाकूर यांचा फोटो डीपीवर ठेऊन चॅटिंग करणाऱ्या ७८९८५०९०५० व ६२३९२८४७९६ या मोबाईल क्रमांक धारकांवर बीड ग्रामीण ठाण्यात २० रोजी रात्री साडेनऊ वाजता फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बाह्यवळण रस्त्यावर गस्त घालत असताना  उपरोक्त दोन क्रमांकावरून संदेश पाठवून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक संतोष साबळे तपास करत आहेत. दरम्यान, सायबर विभागाकडे गुन्हा वर्ग केला जाणार असून प्राथमिक तपासात हे क्रमांक राजस्थानमधील धवलपूरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.माझा फोटो व्हॉटस्अप डीपीला ठेऊन संदेश पाठविले होते. मात्र, कोणाचीही फसवणूक झाली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभाग तपास करत आहे. खात्री केल्याशिवाय कोणीही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये. - नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीड