नागपुरातील क्रिकेट सट्टा अड्ड्याचा भांडाफोड, पोलिसांनी धाड टाकून एकाला केली अटक

By योगेश पांडे | Updated: April 16, 2024 17:30 IST2024-04-16T17:30:03+5:302024-04-16T17:30:50+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली

Cricket betting den in Nagpur raided, police raided and arrested one | नागपुरातील क्रिकेट सट्टा अड्ड्याचा भांडाफोड, पोलिसांनी धाड टाकून एकाला केली अटक

नागपुरातील क्रिकेट सट्टा अड्ड्याचा भांडाफोड, पोलिसांनी धाड टाकून एकाला केली अटक

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भगवाननगर परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.

भगवाननगर येथील ग्रेस अपार्टमेंट येथील फ्लॅट क्रमांक २०२ येथे क्रिकेट सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी सायंकाळनंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे अभिषेक कुमार उर्फ सिकंदर प्रसाद (३६, जगनाडे चौक) हा मोबाईलवरून आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यावर ऑनलाईन खायवाडी करताना आढळला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून टीव्ही, सेट टॉप बॉक्स, पाच मोबाईल व लॅपटॉप जप्त केले. त्याची चौकशी केली असता विलास पाटील (नंदनवन) याच्यासोबत तो क्रिकेट सट्टा अड्डा चालवत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दोघांविरोधातही महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, ईश्वर खोरडे, मिलिंद चौधरी, मुकेश राऊत, प्रवीण लांडे, अमोद जासूद, विनोद गायकवाड, अनुप तायवाडे, संतोष चौधरी, मनिष रामटेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Cricket betting den in Nagpur raided, police raided and arrested one