पतीसोबत दारू पित बसलेल्या चुलत नणंद, तक्रार करण्यास गेलेल्या महिलेस मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:02 IST2023-02-16T12:57:35+5:302023-02-16T13:02:27+5:30
पती हे चुलत नणंद देवकी (पिंकी) उपाध्याय सोबत मद्यपान करत बसले होते .

पतीसोबत दारू पित बसलेल्या चुलत नणंद, तक्रार करण्यास गेलेल्या महिलेस मारहाण
मीरारोड - गाडीत पती सोबत चुलत नणंद दारू पित असल्याचे पाहून तिच्या आईला तक्रार करण्यास गेलेल्या महिलेस मारहाण केल्याच्या घटने प्रकरणी त्या चुलत नणंद सह एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आले. घोडबंदर गावातील उपाध्याय हाऊस मध्ये राहणाऱ्या रिंकी उपाध्याय (३०) ह्या पती संतोष यांना जेवणासाठी बोलावण्यास गेल्या असता बाहेरील गाडीत पती हे चुलत नणंद देवकी (पिंकी) उपाध्याय सोबत मद्यपान करत बसले होते . रिंकी यांनी पती व पिंकी दोघांना जाब विचारला असता पिंकी हि घरात निघून गेली.
रिंकी ह्या पिंकीची मागून तिच्या घरी गेल्या व तिची आई शिसमती याना पिंकी हि आपल्या पती सोबत गाडीत दारू पिट बसली होत असे सांगितले . त्यावर शिसमती यांनी आपली मुलगी पिंकी तसली नाही असे प्रत्युत्तर दिले . त्या नंतर पिंकी सह तिची आई , मोठा भाऊ गौरव , वहिनी तृप्ती यांनी रिंकी यांना मारहाण सुरु केली . तर पिंकीचा लहान भाऊ प्रकाश उर्फ सोनू ह्याने रिंकीच्या डोक्यात दगड मारला . रिंकीला वाचवण्यास त्यांची सासू हौसीला ह्या धावून आल्या असता त्यांना सुद्धा शिवीगाळ व मारहाण करण्यात आली . या प्रकरणी रिंकी यांच्या फिर्यादी नंतर काशीमीरा पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे .