आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:58 PM2021-03-25T19:58:34+5:302021-03-25T19:59:46+5:30

Honor Killing Crime News : झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने ऑनर किलींगच्या (honor killing)एका प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना आणि काका-काकींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Court order death sentenced to four accused of honor killing including parents in Jharkhand | आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा 

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची केली हत्या, कोर्टाने आई-वडिलांना सुनावली फाशीची शिक्षा 

googlenewsNext

रांची - झारखंडमधील (Jharkhand) कोडरमा जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयाने ऑनर किलींगच्या (honor killing)एका प्रकरणात मृत मुलीच्या आई-वडिलांना आणि काका-काकींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी कोडरमा जिल्ह्यातील चंदवारा ठाणे क्षेत्रातील मदनगुडीमध्ये २० वर्षीय सोनी कुमारी या तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  (Court order death sentenced to four accused of honor killing including parents in Jharkhand)

सोनी कुमारी या तरुणीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चितेवरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. 

या प्रकरणात कोडरमा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रामाशंकर सिंह यांच्या न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पूर्ण केल्यानंतर १५ मार्च रोजी मृत सोनी कुमारीचे वडील किसून साव, आई दुलारी देवी, काका सीताराम साव आणि काकी पार्वती देवी यांना दोषी ठरवले होते. दरम्यान आज न्यायालयाने शिक्षेबाबत सुनावणी करताना चारही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

या घटनेनंतर चारही आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मृत सोनी कुमारी हिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे तिचे आई-वडील नाराज झाले होते. त्या रागातून  त्यांनी सोनीची हत्या केली होती.  

Web Title: Court order death sentenced to four accused of honor killing including parents in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.