निर्दयीपणा! सतत मोबाईलवर बोलल्याने बापाने जाळले मुलीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:26 IST2019-01-01T18:24:13+5:302019-01-01T18:26:31+5:30
काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विरार पोलिसांना काल रात्री ७. ४३ वाजताच्या सुमारास संजीवनी रुग्णालयातून याबाबत माहिती कळली. त्यानुसार विरार पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचे वडील मोहम्मद मुर्तिजा मन्सुरीला अटक करण्यात आली आहे.

निर्दयीपणा! सतत मोबाईलवर बोलल्याने बापाने जाळले मुलीला
विरार - सतत मोबाईलवर बोलते म्हणून १६ वर्षाच्या मुलीला बापाने रॉकेल अंगावर आतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना विरार परिसरातील गोपचरपाडा येथे घडली. काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विरार पोलिसांना काल रात्री ७. ४३ वाजताच्या सुमारास संजीवनी रुग्णालयातून याबाबत माहिती कळली. त्यानुसार विरार पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचे वडील मोहम्मद मुर्तिजा मन्सुरीला अटक करण्यात आली आहे.
आपली १६ वर्षीय मुलगी मोबाईल फोन मागून तू कोणाबरोबर बोलत राहते असा जाब विचारून मला आवडत नाही वडिलांनी सांगितले. त्यानंतर मोबाईल फोन जमिनीवर आपटून फोडून टाकून मुलीला शिवीगाळ करून तू कट जा या जल जा असे बोलून घरातील रॉकेलचा डब्बा काढून मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. त्यांनतर तिला संजिवली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आगीत ती ७० टक्के भाजली असून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या निर्दयी पित्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. जळालेली मुलीने अर्धवट शिक्षण सोडले असून ती घरकाम करत असे. तिला २ बहिणी आणि एक भाऊ आहे. वडिलांना ती सतत मोबाईलवर बोलत असल्याने प्रेमसंबंध असल्याचा संशय सतावत होता. शेवटी रागाच्या भरात वडिलांनी मुलीला पेटवून दिले.
सतत मोबाईलवर बोलते म्हणून १६ वर्षाच्या मुलीला बापाने रॉकेल अंगावर आतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना विरार परिसरातील गोपचरपाडा येथे घडली.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019