शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

२०० रुपयांत प्रेमी युगलांना मिळते खासगी केबिन; पोलिसांचा समजताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:27 IST

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या केबिन तासाला 200 रुपये देऊन आरक्षित केल्यानंतर त्यात तरुण-तरुणी अनैतिक कृत्य करतात.

तारानगर (राजस्थान) : परिसरात सुरू असलेल्या हॉटेल्स आणि कॅफेमध्ये जोडप्याला एन्ट्री देऊन पैसे उकळणे, जोडप्याकडून अनैतिक कृत्य करणे यासारख्या प्रकरणांबाबत पोलिसांनीं कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी कॅफेमध्ये बांधलेली केबिन हटवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या केबिन तासाला 200 रुपये देऊन आरक्षित केल्यानंतर त्यात तरुण-तरुणी अनैतिक कृत्य करतात.

चुरू जिल्ह्यातील एका कॅफेमध्ये बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाई करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल-कॅफेवर छापे टाकताना अनेकदा अशा कारवाया पाहायला मिळाल्या आहेत. या कॅफे आणि हॉटेल्सच्या आडून शरीरविक्रीचा धंदाही फोफावत आहे. डीएसपी ओमप्रकाश गोदारा यांच्या सूचनेवरून एसएचओ गोविंदराम विश्नोई यांनी तारानगर शहरातील कॅफे चालकांची पोलीस ठाण्यात चौकशी करून आजच्या नंतर कोणत्याही कॅफेमध्ये कोणतेही अनैतिक कृत्य होऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या. येत्या दोन दिवसांत कोणत्याही कॅफेमध्ये केबिन सापडू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीनंतर काही कॅफेचालकांनी पोलिसांच्या सूचना गांभीर्याने घेत केबिन हटवल्या. मात्र, काही कॅफेमध्ये अजूनही केबिन आहेत. या केबिन्स जोडप्यांना एकटे बसू देतात. बुधवारी, अतिरिक्त एसपी अशोक बुटोलिया एसएचओ गोविंद राम विश्नोई यांनी शहरातील कॅफेची अचानक तपासणी केली. बसस्थानकावर चालवलेले एक कॅफे वगळता बाकी सर्व काही केबिनसह आढळले आहे. कॅफे चालकाला केबिन हटवण्याच्या सूचना आणि शेवटचा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.अतिरिक्त एसपी आणि एसएचओ यांनीही कॅफेचालकांचे परवाने तपासले. मात्र कॅफेचालकांना परवाना मिळालेला नाही. लोकांच्या म्हणण्यानुसार, कॅफे चालकांनी कॅफेच्या आत केबिनची व्यवस्था केली आहे, ज्या कॅबिन जोडपे 200 रुपये प्रति तास भाड्याने घेऊ शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान