बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 22:04 IST2020-05-25T22:00:35+5:302020-05-25T22:04:07+5:30
भाडेकरू संजीव सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बापरे! भाडं दिलं नाही म्हणून घरमालकाच्या मुलाने जोडप्यावर झाडली गोळी; एकाचा मृत्यू
आजमगड - यूपीच्या आजमगड जिल्ह्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन दरम्यान भाडेकरूने भाडे न दिल्याने रागाच्या भरात सोमवारी पहाटे भाडेकरूच्या पतीला गोळ्या घातल्या. यामुळे दोघे गंभीर जखमी झाले. गोळीबाराच्या आवाजाने पहाटेच परिसरात खळबळ उडाली. जखमी भाडेकरू जोडप्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाडेकरू संजीव सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कोतवाली शहरातील एटलास टँकवर असलेल्या राकेश राय यांच्या घरात अहिरूला पोलिस स्टेशन परिसरातील संजीव सिंह भाड्याने राहत होते. तो शहरातच मोटार पार्ट्सचे दुकान चालवतो. लॉकडाऊनमुळे दुकान बंद झाल्यामुळे संजीवला घर चालवणे कठीण झाले. या कारणास्तव, त्याला मालकाला भाडे देता आले नाही. रात्री घरमालक आणि संजीव यांच्यात वाद झाला. पण प्रकरण शांत झाले.
पतीने रुग्णालयात सोडले प्राण
सोमवारी सकाळी घरमालकाच्या मुलाने भाड्याच्या वादातून संजीव सिंह आणि त्यांच्या पत्नीला गोळी घालून गंभीर जखमी केले. पती-पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी दुसरे रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जखमी पती-पत्नीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान पतीचा मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर