भयंकर! कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने विकलं बाळ; असा झाला धक्कादायक घटनेचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 05:04 PM2021-05-14T17:04:40+5:302021-05-14T17:10:33+5:30

Crime News : दाम्पत्याने आपल्या बाळाला एका व्यावसायिकाला तब्बल दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून कार विकत घेतली.

couple sells newborn to buy car in kannauj uttar pradesh | भयंकर! कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने विकलं बाळ; असा झाला धक्कादायक घटनेचा उलगडा

भयंकर! कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने विकलं बाळ; असा झाला धक्कादायक घटनेचा उलगडा

Next

नवी दिल्ली - देश कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये घडली आहे. एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या मुलाला विकलं आहे. आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या दाम्पत्याने आपल्या बाळाला एका व्यावसायिकाला तब्बल दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून कार विकत घेतली. पोलिसांनी या प्रकरणी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नौजमधील तिरवा कोतवाली भागातील सतौर गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी बाळाचा जन्म झाला होता. मात्र पैशाच्या हव्यासापोटी आणि कार विकत घेण्यासाठी एका दाम्पत्याने आपल्या बाळाला गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकलं. आपलं तीन महिन्यांचं बाळ दीड लाख रुपयांना विकलं. तसेच बाळ विकल्यानंतर आठ दिवस कोणालाही याचा पत्ताच लागू दिला नाही. मात्र नातवाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रार ऐकून सुरुवातीला पोलिसांनाही धक्का बसला. 

पोलिसांनी य़ा प्रकरणाची कसून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळ सध्या व्यावसायिकाच्या ताब्यात असून या प्रकरणी आम्ही दाम्पत्याची चौकशी करत आहोत. या दाम्पत्याने नुकतीच एक कार  खरेदी केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहे. मात्र याच दरम्यान ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अनेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन तुटवडा असल्याची नोटीस लावली आहे. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसरीकडे रुग्णाला उपचारासाठी दाखल करा असं देखील सांगण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना माणुसकीला काळीमा घटना समोर आली आहे. 

लज्जास्पद! कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर शोधणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी 

लोकांच्या हतबलतेचा, परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केली गेल्याचा भयंकर प्रकार ट्विटरवरून समोर आला आहे. एका तरुणीने हा लज्जास्पद प्रकार सर्वांसमोर आणला आहे. सोशल मीडियावर या प्रकाराविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेत होती. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. अत्यंत घाणेरड्या भाषेत त्या व्यक्तीने पीडित मुलीकडे सेक्सची मागणी केली. भावरीन कंधारी या तरुणीने सोशल मीडियातून या घटनेला वाचा फोडली आहे. अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Web Title: couple sells newborn to buy car in kannauj uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.