‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ असं सुसाईट नोटमध्ये लिहून दाम्पत्याने विष प्राशन करून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 19:07 IST2021-02-12T19:07:25+5:302021-02-12T19:07:51+5:30
Suicide of Couple : राजू गुप्ता यांचे श्री संत जगनाडे महाराज व्यावसायायिक संकुल येथे विजय ट्रेडर्स या नावाने हार्डवेअरचे दुकान आहे.

‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ असं सुसाईट नोटमध्ये लिहून दाम्पत्याने विष प्राशन करून केली आत्महत्या
नागपूर (उमरेड) : आजारपण आणि त्यातून उद्भवलेल्या आर्थिक चणचणीतून उमरेड येथील दाम्पत्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृद्य हेलावून टाकणारी घटना आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजू सोहनलाल गुप्ता (६०) आणि संध्या राजू गुप्ता (५५) असे या दाम्पत्यांची नावे आहेत. उमरेड बसस्थानक लगत असलेल्या महावैष्णवी कॉम्पलेक्स येथे ते वास्तव्याला होते. राजू गुप्ता यांचे श्री संत जगनाडे महाराज व्यावसायायिक संकुल येथे विजय ट्रेडर्स या नावाने हार्डवेअरचे दुकान आहे.
त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून ‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवल्याचीही बाब तपासात उघडकीस आली आहे. मुलगा विक्की काही कामानिमीत्ताने नागपूरला गेला होता. घरी राजू आणि संध्या गुप्ता दोघेही होते. बऱ्याच दिवसांपासून आजारपणामुळे दोघेही त्रस्त होते. यातूनच आर्थिक ताण वाढत गेल्याने दोघांनीही विषारी औषध प्राशन करीत मृत्यूला जवळ केले. घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.