मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:44 IST2025-06-27T14:44:10+5:302025-06-27T14:44:44+5:30

या APP मधून पुरुषाने जितके वाहन चालवून पैसे कमावले नाहीत त्यापेक्षा अधिक पटीने त्याचे व्हिडिओ विकून पैसे कमावले आहेत असं पोलिसांनी सांगितले. 

Couple arrested for live streaming private moments while wearing masks | मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक

मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक

हैदराबाद इथं एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी जोडप्याला आक्षेपार्ह कृत्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हे जोडपे चेहऱ्यावर मास्क लावून एका मोबाईल APP च्या माध्यमातून त्यांचे खासगी क्षण लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. त्याबदल्यात या दोघांना पैसे मिळायचे. अटक केलेल्या जोडप्यामधील पुरुषाचे वय ४१ तर महिलेचे वय ३७ असल्याचे समोर आले आहे. अंबरपेटच्या मल्लिकार्जुन नगरमधील ही घटना आहे. पोलिसांना या दोघांच्या घरातून अनेक साहित्य जप्त केलेत. त्यात हायडेफिनिशन असणारा कॅमेऱ्याचा समावेश आहे.

लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न

पोलिसांच्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. लवकर श्रीमंत होण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जाते. यातील आरोपी पती एका कॅबवर चालक म्हणून काम करतो. अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी या जोडप्यांनी त्यांचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ शूट करणे सुरू केले. त्यानंतर एका APP च्या माध्यमातून हे व्हिडिओ शेअर केले जात होते. 

भारतात पॉर्न बंद असले तरी अनेक अशा साईट आजही सुरू आहेत. त्यात APP च्या माध्यमातून हे व्हिडिओ पाहणाऱ्यांध्ये युवकांचा समावेश आहे. त्यावर कंटेटच्या बदल्यात पैसे दिले जायचे. लाईव्ह स्ट्रीम करून त्यांना २ हजार रुपये मिळायचे तर रेकॉर्डेड क्लिप पाठवल्यास ५०० रूपये मिळायचे. या APP मधून पुरुषाने जितके वाहन चालवून पैसे कमावले नाहीत त्यापेक्षा अधिक पटीने त्याचे व्हिडिओ विकून पैसे कमावले आहेत असं पोलिसांनी सांगितले. 

ओळख लपवण्यासाठी घातले मास्क

दरम्यान, हे जोडपे त्यांचे खासगी क्षण एचडी कॅमेऱ्यात कैद करायचे. त्यावेळी स्वत:ची ओळख लपवण्यासाठी ते चेहऱ्यावर मास्कचा वापर करत होते. पोलिसांना या जोडप्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यांच्या घरी धाड टाकली आणि दोघांना अटक केली. सध्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. 
 

Web Title: Couple arrested for live streaming private moments while wearing masks