शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

रावेर दंगलीतील नुकसानीचा खर्च आरोपींकडून होणार वसूल,  प्रस्ताव सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:21 AM

 संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.

जळगाव- रावेर येथे २२ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीत झालेले नुकसान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून वसूल करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस विभागाने जिल्हाधिका-यांकडे सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियमातील तरतूदीच्या आधारावर महाराष्टÑात प्रथमच असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ६ कोटी २० लाख ९१ हजार ५५ रुपयांचे नुकसान या दंगलीच झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम उपस्थित होते. संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. सरकारी व खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निष्पाप लोकांना या दंगलीची झळ बसली होती. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम,रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे व उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांनी रावेर दंगलीचा अभ्यास करुन तेथील संवेदनशील भाग अशांत म्हणून घोषीत करण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

काय आहे कायदामुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५१ (३) (१) व  ५१ (४) (ब)अन्वये दंगलीत किंवा एखाद्या आपला हेतू साध्य करण्यासाठी हानी तसेच कोणाचा मृत्यू झाला असेल तर संबंधितांकडून त्याची नुकसान भरपाई करण्याची तरतूद आहे. ही नुकसान भरपाई वैयक्तिक किंवा विविध कराच्या माध्यमातून पालिकेने वसूल करायची व वसुल रकमेचे वाटप मृत व्यक्ती, नुकसान झालेल्या संस्था, वाहने याचे वर्गीकरण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत. पोलीस दलाने कायद्याचा आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.

रावेरात ७४ वर्षात ४२ दंगलीरावेर शहरात १९४६ ते मार्च २०२० या कालावधीत ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण करणा-या तब्बल ७४ दंगली झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. प्रत्येक दंगलीत गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे, त्यांना कारागृहात पाठविणे व कायद्यान्वे शिक्षा या प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे. आता प्रथमच नुकसान करणा-यांकडून त्याची वसुली करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. 

 या गुन्ह्यात निष्पन्न व अटक झालेल्या काही आरोपींवर मागील रेकॉर्ड बघून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दंगलीमुळे काय नुकसान होते, दंगेखोरांमध्ये वचक बसावा यासाठी त्यांच्याकडूनच त्याची वसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यात देखील तशी तरतूद असून त्याचाच आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

रावेर दंगल दृष्टीक्षेपातमयत :  १ पुरुषगंभीर जखमी : २ पुरुषएकुण आरोपी : ३७७अटक आरोपी : १५३एकुण गुन्हे :   ७दोषारोपपत्र दाखल :   १६ जून २०२०पोलीस बंदोबस्त खर्च :   ६ कोटी १४ लाख ९२ हजार ५९जाळपोड व तोडफोड नुकसान :    ५ लाख २१ हजारपालिकेचा व्यवस्थापनात झालेला खर्च : ७७ हजारमहावितरण कंपनीचे नुकसान : १ हजार

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेरJalgaonजळगाव