शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस हवालदाराला एसीबीने रंगेहाथ पकडले; गुन्हा दाखल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:57 IST

ACB arrested Police Havaldar : मंगळवारी रात्री सुमारे 10 नंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील पडलेल्या रिकाम्या खोलीत  18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे( वय 50) यास रंगेहाथ पकडण्यात आले.    

ठळक मुद्देदोडाईचातील लाचखोर विजय मोरे हवालदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्या विरोधात दोडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

दोंडाईचा: गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल न करता या गुन्ह्याची ब वर्गात समरी पाठवावी,या मोबदल्यात अठरा हजाराची लाच मागणे दोडाईचातील पोलीस हवालदाराला चांगलेच महागात पडले. दोडाईचातील लाचखोर विजय मोरे हवालदाराला नाशिकच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री लाच घेताना रंगेहाथ पकडले असून त्या विरोधात दोडाईचा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.     

रामी येथील तक्रार धारक योगेश संतोष कोळी व त्याचा नातेवाईक विरूद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात  दाखल केलेल्या  गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल न करता ब वर्गात समरी पाठवावी, या साठी 20 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी हवालदार विजय मोरे यांनी केली होती.तडजोडी नंतर 18 हजार रुपये देण्याचे ठरले.तडजोडी नंतर 18 हजार रुपयाची लाच मागत असल्याची तक्रार नाशिकचालाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे करण्यात आली.त्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टीमने सापळा रचला.मंगळवारी रात्री सुमारे 10 नंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील पडलेल्या रिकाम्या खोलीत  18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे( वय 50) यास रंगेहाथ पकडण्यात आले.

   

या सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक  सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक  निलेश सोनवणे, पोलीस उप-अधीक्षक  विभाग  विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक  उज्वलकुमार पाटील, पोलीस हवलदार दिपक कुशारे,सचीन गोसावी, पोलीस नाईक एकनाथ बावीस्कर,प्रकाश डोंगरे आदींनी   रंगेहाथ संशयित आरोपीस पकडले.दोंडाईचा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकNashikनाशिक