नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:07 IST2018-11-05T20:06:47+5:302018-11-05T20:07:13+5:30

वैभव पाटील हा शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचा मुलगा तर मयूर भोईर हा भाजपचे विद्यमान नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा आहे.

Corporal son's daughter beaten to death; This action is done by asking for a video sharing | नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य  

नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य  

कल्याण - सोशल मीडियावर अपलोड केलेला व्हिडीओ शेयर का केला असा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणीला सेना भाजपच्या आजी माजी नगरसेवकांच्या पुत्रांनी आपल्या साथीदारासह बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात वैभव पाटील व मयूर भोईर याच्यासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव पाटील हा शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचा मुलगा तर मयूर भोईर हा भाजपचे विद्यमान नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा आहे.

पीडित तरुणी कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात राहत असून या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा मुलगा वैभव पाटील याने शेयर केला. त्यामुळे या पीडित तरुणीने त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या वैभवने मयूर भोईर व त्याच्या साथीदारांना घेऊन पीडित तरुणीचे घर गाठले आणि तिला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडित तरुणीने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी नगरसेवक पुत्र वैभव पाटील व मयूर भोईर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: Corporal son's daughter beaten to death; This action is done by asking for a video sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.