शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Coronavirus : रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड, एलसीबीने असे फोडले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 8:49 PM

Remadesivir racket exposed: रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे.

यवतमाळ - रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे. हाच धागा पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबमधील एका वादग्रस्त डॉक्टरच्या मेडिकलवर फंटर पाठविला. सुरुवातीला तीन इंजेक्शन व नंतर सहा असे नऊ इंजेक्शन खरेदी करण्यात आले. यात पोलिसांनी रंगेहात चौघांना अटक केली. यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.कळंबमधील वादग्रस्त डॉ. अक्षय तुंडलवार यांच्या मेडिकलमधून रेमडेसिविरची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यावरून एलसीबीने एक डमी ग्राहक पाठवून तेथे रेमडेसिविरची मागणी केली. सुरुवातीला ३६ हजारात तीन इंजेक्शन खरेदीचा व्यवहार ठरला. या प्रमाणे मेडिकल स्टोअर्समधील सावंत पवार याने कळंबमधील छत्रपती शिवाजी महाराज उडाण पुलाखाली तीन इंजेक्शन काढून दिले. दबा धरुन असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. डॉ. अक्षय तुंडलवार यालाही ताब्यात घेतले. बाजीरावचा हिसका दाखवताच त्यात कळंब कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेला कंत्राटी परिचारक सौरभ मोगरकर याने हे इंजेक्शन पुरविल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ सौरभला ताब्यात घेऊन आणखी सहा इंजेक्शनची मागणी करायला लावली. त्याने यवतमाळातील जाजू चौक स्थित एका महिलेकडून सहा रेमडेसिविर पुन्हा बोलावून दिले.पोलीस पथकाने लागलीच त्या महिलेला अटक केली. काही तासाच्या कारवाईत रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉ. अक्षय तुंडलवार रा. कळंब, मेडिकल स्टोअरवरील कर्मचारी सावंत पवार, आरोग्य परिचारक सौरभ मोगरकर आणि जाजू चौक येथील ५७ वर्षीय महिला यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ रेमडेसिविर जप्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे,स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी व कर्मचाऱ्यांंनी ही कारवाई केली. शासकीय कोविडवर संशयाची सुईरुग्णांना दिले जाणारे डोस न लावता ते बाहेर विक्रीला आणले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. आरोग्य कर्मचारी असलेला सौरभ मोगरकर हा यवतमाळ येथील रुग्णालयातही काही दिवस कार्यरत होता. तर ज्या महिलेने रेमडेसिविर पुरविले तिची मुलगीही नागपूरमध्ये परिचारिका असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे इंजेक्शन नेमके आणले काेठून याचा शोध पोलीस घेत आहे. प्रथमदर्शनी शासकीय कोविडवरच संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीremdesivirरेमडेसिवीर