शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

Coronavirus : अफवा पसरविणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 18:44 IST

Coronavirus : युट्युबवर कोरोना व्हायरस कुक्कुट उत्पादनांमुळे होतो अशी अफवा पसरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधी संघर्ष बालक आणि आंध्रप्रदेशातील मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे सायबर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ५०५, १ (ब) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. कोंबड्यांमुळे कोरोना होता असा व्हिडीओ खात्री न करता सत्तारने त्याच्या युट्युब चॅनेलवर अप्लोड केला. म्हणून त्याला अटक करण्यात आली.  

मुंबई - सोशल मीडियावरून कोंबड्यांमुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो अशा आशयाचे अफवा पसरवणारे व्हिडीओ वायरल करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. युट्युबवर कोरोना व्हायरस कुक्कुट उत्पादनांमुळे होतो अशी अफवा पसरविणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधी संघर्ष बालक आणि आंध्रप्रदेशातील मोहम्मद अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप आणि युट्युब यावर आपल्या देशात आणि राज्यात कुक्कुट मास आणि इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील समावेशाबाबत  अनेक अफवा पसविल्या जात आहेत. त्यामुळे कुक्कुट खाद्यनिर्मिती आणि कुक्कुट पालनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना व्हायरस मानवी आरोग्यास धोका पोहचू शकतो अशी अफवा पसरवली जात असल्याची माहिती पुण्यातील महाराष्ट्र शासनाचे पशु संवर्धन आयुक्तालय यांनी दिली. तसेच सायबर पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दाखल करण्यात आला. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ५०५, १ (ब) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

त्यानंतर गुन्ह्यात न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५५ (२) अन्वये गुन्ह्याचा तपास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गुन्ह्याचा पुढील तपास सतबीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला. या तपासात युट्युबमध्ये अफवा पसविणाऱ्यांची माहिती काढण्यात आली. तसेच युट्युबवरील अफवा पसरवणारे व्हिडीओ दिलीत करण्यात आले आहेत. त्यातील एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजुर्ग येथील एकामहीलेच्या मोबाईल क्रमांकावरून अपलोड केल्याची निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर पोलिसांनी एक पथक उत्तर प्रदेशात पाठविले. या पथकाने महिलेची चौकशी केली असता व्हिडीओ अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचे सिमकार्ड तिने जवळच्याच गावात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या मुलास दिल्याचे आणि तोच वापरत असल्याचे तपासत उघडकीस आले. 

 

मुलाचा शोध घेतला असता तो मुलगा १६ वर्षाचा असल्याचे उघड झाले. तो वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने त्याच्या मावशीच्या मोबाईल क्रमांकाद्वारे टिकटॉक, फेसबुकवर अकाउंट उघडले आणि वयाची खोटी माहिती देऊन स्वतःच्या ईमेल आयडी देखील उघडला. त्याने युट्युबवर पाहून युट्युब चॅनेल सुरु केला. त्यावर त्याने ६० पेक्षा अधिक व्हिडीओ अपलोड केले. १ महिन्यापूर्वी कोरोना व्हायरसची लग्न कोंबड्यांमुळे होते असा व्हिडीओ त्याला मिळाला होता आणि तो खरा आहे की खोटा याची शहनिशा न करता त्याने व्हिडीओ युट्युबवर अपलोड केला होता. तसंच दुसरा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील शहाशेब येथे राहणाऱ्या मोहम्मद अब्दुल सत्तारने अपलोड केला होता. सायबर पोलिसांच्या दुसरे पथक आंध्रप्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने सत्तारला अष्टक केली. सत्तारचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान असून त्याचा स्वतःचा AL QURAN SAYING  हा युट्युब चॅनल आहे. या चॅनेल आतापर्यंत ८० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. कोंबड्यांमुळे कोरोना होता असा व्हिडीओ खात्री न करता सत्तारने त्याच्या युट्युब चॅनेलवर अप्लोड केला. म्हणून त्याला अटक करण्यात आली.  

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइमArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशAndhra Pradeshआंध्र प्रदेश