Coronavirus: Public gathering ban in Mumbai from March 27, order of police commissioner pda | Coronavirus : मुंबईत २७ मार्चपासून पुन्हा जमावबंदी, पोलीस आयुक्तांचे आदेश

Coronavirus : मुंबईत २७ मार्चपासून पुन्हा जमावबंदी, पोलीस आयुक्तांचे आदेश

ठळक मुद्देगुडी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडी मोकळीक देण्यात आली असून शुक्रवारपासून पुन्हा जमावबंदी लागू केली जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७ (३) अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या पादूर्भावामुळे मुंबई शहर व उपनगरात जमाव बंदी करण्यात आलेली आहे. येत्या २७ मार्चपासून ते १० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने एकत्रित फिरणाऱ्या, आंदोलन करणारे नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. गुडी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडी मोकळीक देण्यात आली असून शुक्रवारपासून पुन्हा जमावबंदी लागू केली जाणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Coronavirus : ड्रोनसह इतर उड्डाणांवर महिनाभर बंदी


महानगरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जमावबंदी संबंधी नव्याने आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारकडून नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असून रेल्वे स्टेशन,बस स्थानकावर प्रवास्यांची गर्दी कायम आहे. त्यामुळे त्यांना प्रतिबंध घालून शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून ते १० एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत जमाव बंदी लागू केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३७ (३) अन्वये ही बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक प्रमाणात एकत्रित फिरणाऱ्या इसमांवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Coronavirus: Public gathering ban in Mumbai from March 27, order of police commissioner pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.