शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown : नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्यांनी पोलिसांवर केली दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 20:30 IST

Coronavirus Lockdown : लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.

ठळक मुद्देपुलवाममध्ये नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्या लोकांना पोलिसांनी एकत्र जमण्यास मज्जाव केला.लॉकडाउनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत खोऱ्यात अजूनही अनेक लोक मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी पोहोचत आहेत.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील जिल्हा पुलवाममध्ये नमाज-ए-जुम्मा अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्या लोकांना पोलिसांनी एकत्र जमण्यास मज्जाव केला. त्यानंतर संतप्त मुस्लिम बांधवांनी पोलिसांवरदगडफेक सुरू केली. नंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.काश्मीर खोऱ्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन आणि धार्मिक संघटना वारंवार लोकांना मशिदीत येऊ नका आणि घरात नमाज अदा करण्यास सांगत आहेत. लॉकडाउनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत खोऱ्यात अजूनही अनेक लोक मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी पोहोचत आहेत. शुक्रवारी, पुलवामा येथील कासबयार द्रबगाम परिसरातील एका मशिदीत शुक्रवारी 100 हून अधिक लोक नमाज-ए-जुम्मा देण्यासाठी जमले. पोलिसांना याची माहिती मिळाली आणि ते लोकांना समजवण्यासाठी तिथे पोहोचले. त्याने लोकांना कोरोना महामारीचा हवाला देत मशिद सोडून आपल्या घरी परतण्यास सांगितले. पोलिसांचे म्हणणे ऐकण्याऐवजी जमलेले नामाजी बाहेर आले आणि त्यांना तेथून पळ काढण्यासाठी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. यावर पोलिसांनी कडक पावले उचलून गर्दी पांगवण्यासाठी दोन अश्रुधुंद नळकांड्या फोडल्या. पोलिस आणि लोक यांच्यात झालेल्या हाणामारीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.याची माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिका्यांनी सांगितले की, हे प्रकरण दुपारनंतरचे होते. पोलिसांनी मशिदीत जमलेल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. ऐकण्याऐवजी त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. याक्षणी परिस्थिती नियंत्रित आहे.शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन लोकांनी असे कृत्य करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारच्या  दिवशी बांदीपोरा आणि त्रालमधील बरेच लोक नमाज-ए-जुम्मा करण्यासाठी मशिदीत पोहोचले. पोलिसांनी नकार दिल्यास त्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेकांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, ही कोणतीही लहान गोष्ट नाही. हे लोक लॉकडाउनचे उल्लंघन करीत आहेत आणि साथीच्या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :stone peltingदगडफेकPoliceपोलिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरMosqueमशिदcorona virusकोरोना वायरस बातम्या