जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 10:36 PM2020-03-28T22:36:38+5:302020-03-28T22:38:55+5:30

CoronaVirus Lockdown : दूरवर राहणाऱ्या लोकांवर त्यांचे मृत आई - वडील आणि जवळच्या नातलगांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर पडताना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

CoronaVirus Lockdown: the only son who left his mothers funeral home was beaten by the police pda | जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण

जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण

Next
ठळक मुद्देठाण्यात फर्निचरचं काम करणाऱ्या भैरोंलाल लोहारची आई रुक्मिणीबाई यांचे राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात निधन झाले. या बातमीने भैरोंलाल लोहार यांना धक्का बसला. भैरोंलाल यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गावातून आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले. या प्रिंटआउटच्या आधारे स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली.

ठाणे - कोरोना विषाणूमुळे देशात संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. परंतु यावेळी पोलिसांची एक चांगली तर दुसरी अमानुष बाजू दिसून येत आहेत. अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यात दूरवर राहणाऱ्या लोकांवर त्यांचे मृत आई - वडील आणि जवळच्या नातलगांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर पडताना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

ठाण्यात फर्निचरचं काम करणाऱ्या भैरोंलाल लोहारची आई रुक्मिणीबाई यांचे राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात निधन झाले. या बातमीने भैरोंलाल लोहार यांना धक्का बसला. आईचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे भैरोंलाल यांना त्यांच्या अंत्यसंस्कारात जाणे आवश्यक होते. त्याच्या हातून अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र, कर्फ्यूदरम्यान घराबाहेर कसे पडायचे ही समस्या होती.


त्यांनी आपला मित्र आणि शिवसेनेचे स्थानिक उपशाखा प्रमुख राजू शिरोडकर यांची मदत घेतली. शिरोडकर यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. ज्यामध्ये भैरोंलाल व त्याचे कुटुंब राजस्थानला जाऊ शकले. भैरोंलाल यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गावातून आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले. या प्रिंटआउटच्या आधारे स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली.


प्रवासादरम्यान त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही अडचण आली नाही.परंतु गुजरातच्या सीमेवर पोहोचताच गुजरात पोलिसांनी त्याला रोखले. पोलीस त्याचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते. त्याने मोठ्याने त्याच्यावर आरडाओरडा केला. पण त्याला आणखी पुढे जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने मोबाइलवर व्हिडिओ कॉलद्वारे पुरावा म्हणून त्याच्या मृत आईचा मृतदेह दर्शविणे सुरू केले, त्यावेळी पोलिसांचा पारा चढला. त्याने मोबाइल उचलला आणि फेकून दिला. मृत्यूचे प्रमाणपत्र फाटले.

भैरों लाल, त्याचा भाऊ आणि रुग्णवाहिका चालक यांना लाठ्यांनी इतके मारहाण केली की तीन दिवसांनंतरही त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. रुग्णवाहिकेत बसलेल्या भैरोंलाल यांच्या पत्नीने खूप विनवणी केली. परंतु पोलिसांनी त्यांचेही काही ऐकले नाही. आईला मुखाग्नी देऊ न शकल्याने भैरोंलाल दु: खी राहिले. त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना आईचा अंत्यसंस्कार करावा लागला.

Web Title: CoronaVirus Lockdown: the only son who left his mothers funeral home was beaten by the police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.