Coronavirus Lockdown : During the lockdown, the soldier's hand's fingers was cut off pda | Coronavirus Lockdown : खेदजनक! लॉकडाऊनदरम्यान पहारा देणाऱ्या जवानाच्या हाताची बोटं कापली

Coronavirus Lockdown : खेदजनक! लॉकडाऊनदरम्यान पहारा देणाऱ्या जवानाच्या हाताची बोटं कापली

ठळक मुद्देया हल्ल्यात जखमी झालेले जवान दिलबाग सिंह हे सुट्टी असल्याने गावी आले आहेत. या हल्ल्यात जवानाच्या उजव्या हाताची बोटं हल्लेखोरांनी कापली तर चार इतर युवक जखमी झाले.

करनल - हरियाणा येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. काही भागांत लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलीस कंबर कसत आहेत. जिल्ह्यातील बयानामध्ये लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी लष्करी जवान आणि काही तरुण पहारा देत आहेत. दरम्यान, काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची खेदजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात जवानाच्या उजव्या हाताची बोटं हल्लेखोरांनी कापली तर चार इतर युवक जखमी झाले.

दुचाकीस्वारांना लॉकडाऊनदरम्यान रोखल्याने त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले जवान दिलबाग सिंह हे सुट्टी असल्याने गावी आले आहेत. सैनिक असलेले दिलबाग हे श्रीनगर येथे लष्करात तैनात आहेत. त्यांना 9 मार्चला सुट्टी मिळाल्याने ते आपल्या गावी आले आणि 28 मार्चला पुन्हा कर्तव्यावर जाणार होते, मात्र लॉकडाऊनमुळे सुट्टी पुढे वाढविण्यात आली. 

गावात कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे सरकारद्वारे लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी गावकरी अथक प्रयत्न करत आहेत आणि गावाबाहेरील लोकांना गावात न येऊ देण्यासाठी पहारा देण्यात येत आहे. यासाठी स्थानिक तरुणांनी पथके बनवली आहेत. या पथकातील सदस्य सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवून गावकऱ्यांना लॉकडाऊनचे नियम पळण्यास सांगत आहेत. ते विनाकारण गावबाहेरून येणाऱ्यांना अटकाव करत आहेत.

मंगळवारी या तरुणांसोबत जवान असलेला दिलबाग देखील गावात पहारा देत होता. त्यावेळी काही लोकं गावबाहेरून दुचाकीवरून गावात घुसले. दिलबाग आणि इतर तरुणांनी त्यांना रोखले आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. यावरून वादंग निर्माण झाला. त्यांनतर दुचाकीवरून आलेल्या लोकांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी जवान दिलबागच्या उजव्या हाताची बोटे कापली आणि रणवीर सिंहसहित चार तरुण गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांमध्ये  मनीष, प्रदीप, विक्की, पंकज याच्यासहित इतर युवक सामील होते. जखमी जवानासह इतर तरुणांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एका हल्लेखोरास गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी यबाबत तपास सुरू केला असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी छापमारी सुरू केली आहे.

Web Title: Coronavirus Lockdown : During the lockdown, the soldier's hand's fingers was cut off pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.