Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:28 PM2020-04-09T21:28:16+5:302020-04-09T21:32:57+5:30

२४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत.

Coronavirus : 'Lockdown' criminalized during lockdown, only ban orders in state, cyber crime pda | Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

Next
ठळक मुद्देहत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

मुंबई : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सगळे जग हादरून गेले असताना त्याचा एकमेव सकारात्मक परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. लॉकडाउन झाल्यापासून राज्यात शरीरासंबंधी  व रस्त्यावरील गुन्हे जवळपास थंडावले आहेत. हत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. २४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत.
 

पोलीस ठाण्यातील बहुतांश अधिकारी व अंमलदार हे हद्दीत बंदोबस्त व नाकाबंदीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे पोलीस ठाणी ही सुनीसुनी व मोकळी असल्याची परिस्थिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.
 

कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास मुभा आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल्स वगळता सर्व अन्य बाजारपेठा पुर्णपणे बंद असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसला आहे. कार्यालये बंद असल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने महिला, तरुणीवरील अत्याचार तसेच दागिने, पर्स पळविणे, खिसे कापणे यासारखे प्रकार थांबला आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर व्हायरल करणे, त्यातून बदनामी करणे आदीबाबतच्या गुन्ह्यामध्ये मात्र घडत आहेत. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यात एरवी दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण पुर्णपणे थांबले आहे.  दाखल झाला तर एखादा अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल होतो, त्याशिवाय आयपीसी १८८ कलमान्वये बंदी आदेश मोडणे आणि सायबरचे गुन्हे मात्र दाखल होत आहेत, अशी कबुली वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

 

कोरोनाच्या प्रतिबंधाला प्राधान्य
समाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे. लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे.
मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )समाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे .लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे. - मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )

Web Title: Coronavirus : 'Lockdown' criminalized during lockdown, only ban orders in state, cyber crime pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.