शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 22:39 IST

Coronavirus Lockdown : १२ हजार ४२० वाहने जप्त, पुण्यात सर्वाधिक उल्लंघन

ठळक मुद्देतब्बल १२ हजार ४२० वाहने जप्त करत ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध २७ हजार ४३२ गुन्हे पोलिसांच्या दफ्तरी नोंद झाले आहेत. यात, तब्बल १२ हजार ४२० वाहने जप्त करत ९५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

       यात पुण्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार २५५ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर, अहमदनगरचा क्रमांक लागतो. याच काळात राज्यभरात ४३८ व्यक्तींनी ‘होम क्वारंटाइन’चे आदेश पायमल्ली तुडवले आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. सध्या सगळीकड़े जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्या नाकीनउ आले. अशात काहीनी या पोलिसांनाच टार्गेट केले. अशाप्रकारे राज्यभरात पोलिसांवर हल्ला चढ़विल्याप्रकरणी तब्बल ६० गुन्हे दाखल असून १६१ जणांना बेडया ठोकण्यत आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी याचाही विचार करणे गरजेचे आहे.             अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत राज्यात एकूण २७ हजार ४३२ गुन्हे नोंदवून १८८६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पुणे शहर(३२५५), सोलापूर शहर(२५९४), अहमदनगर(२४४९)नागपूर शहर(१९९९), पिंपरी चिंचवड(१९३३) येथे सर्वाधिक गुह्यांची नोंद आहे. तर मुंबईत १६७९ गुन्हे दाखल आहेत.         पोलीस नियंत्रणात कक्षात ५८ हजार तक्रारीया काळात राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कोरोनाबाबत  तब्बल ५८ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सोमवारी दिवासभरात तब्बल ६ हजार १३ तक्रारीचा यात समावेश आहे. नागपुरमधून सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६८, मुंबई १४ हजार ६९८ कॉल्स आले आहेत. तर याबाबत  बुलढाणा आणि अमरावतीतून एकही कॉल आलेला नाही.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरPuneपुणे