Coronavirus : अफवा पसरवाल तर याद राखा, महाराष्ट्रात ७८ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 20:08 IST2020-04-04T20:03:31+5:302020-04-04T20:08:45+5:30
Coronavirus : मुंबई, मालेगावमध्ये धार्मिक भावना भड़काविल्याप्रकरणी गुन्हे

Coronavirus : अफवा पसरवाल तर याद राखा, महाराष्ट्रात ७८ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई - अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात दाखल गुह्यांचा आकड़ा ७८ वर पोहचला आहे. ३ एप्रिलपर्यंतची ही कारवाई आहे. तर मुंबई आणि मालेगावमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट, व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सायबरने केलेल्या कारवाईत मुंबई ८, पुणे ग्रामीण ६, सातारा ६, बीड ५, नाशिक ग्रामीण ५,नागपूर शहर ४ ,नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, कोल्हापूर ४ , गोंदिया ३, भंडारा ३ , जळगाव ३. सोलापूर ग्रामीण २,सिंधुदुर्ग २, पुणे शहर १(अदखलपात्र गुन्हा) समावेश आहे. यात काहीनी धार्मिक रंग देण्यास सुरुवात केल्याचेही समोर येत आहे. त्यानुसार सायबर पोलीस सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई सायबर सेलने दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आणखीन एका घटनेत डोंगरी भागातील काही तरुण व्हॉट्स अॅपद्वारे अफवा पसरणविण्याचे संदेश फॉरवर्ड करत व एकत्र जमून लागू असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करत होते, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले.