शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

CoronaVirus: माणुसकीला कलंक! ऑक्सिजन सिलेंडर सांगून विकत होते Fire Extinguisher, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 19:21 IST

द्वारका जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवून चौकशीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आशुतोष आणि आयुष यांचे मोबाईल नंबर सर्व्हिलांसवर लावून त्यांचे लोकेशेन मिळवले आणि मग... (CoronaVirus )

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे काळाबाजार आन् फसवाफसवी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आज अशाच दोन जणांना अटक केली. हे दोघे कोरोनाच्या या कठीण काळात ऑक्सिजन सिलेंडरच्या नावावर फायर एक्सटिंग्विशर विकून फसवाफसवी करत होते.

आधी दिल्ली पोलिसांनीऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या काहींना अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी अटक केलेले हे दोन आरोपी माणुसकीच्या नावावर कलंक आहेत.

बिंदापूर येथील गीता अरोडा यांनी उत्तम नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती, की त्यांना आपल्या रुग्णासाठी ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता होती. बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्यांना कुठल्याही रुग्णालयात जागा मिळाली नाही. तेव्हा ऑक्सिजन सिलेंडरचा शोध घेत असताना त्यांची ओळख आशुतोष नावाच्या एका व्यक्तीशी झाली. आशुतोष सोबत त्याचा एक सहकारी आयुष देखील होता.

Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?

या दोघांनी गीता अरोडा यांना ऑक्सिजन सिलेंडरच्या नावाने फायर एक्सटिंग्विशर विकले. गीता अरोडा यांना हे समजल्यानंतर, त्यांनी या दोघांना बरेच फोन केले. मात्र, त्यांचा फोन बंद झाला होता. यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर द्वारका जिल्ह्यातील पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवून चौकशीला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आशुतोष आणि आयुष यांचे मोबाईल नंबर सर्व्हिलांसवर लावून त्यांचे लोकेशेन मिळवले आणि त्यांना अटक केली. आशुतोष आणि आयुष दोघेही विकासपुरी येथील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 फायर एक्सटिंग्विशर जप्त केले आहेत.

CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878  रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनPoliceपोलिस