शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus: ८५० द्या अन् खासगी लॅबकडून कोरोना चाचणी करा; महापालिकेच्या देखरेखीत विमानतळावर प्रवाशांची लूट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 22:40 IST

कोरोना संसर्ग रोखण्याकरीता संसर्ग झालेल्याना शोधण्यासाठी मुंबई महापालिका अँटीजेन चाचणी सर्वत्र मोफत करत आहे

मुंबई - मुंबई महापालिका कोरोनाच्या अँटीजेन चाचण्या सर्वत्र मोफत करत असून आरटीपीसीआर चाचण्यासुद्धा महापालिका अनेक ठिकाणी विनामूल्य करत आहे. परंतु मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर मात्र महापालिका कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात रोज हजारो प्रवाशांकडून खासगी लॅब मार्फत प्रत्येकी साडे आठशे रुपये मोजून कोरोनाच्या चाचण्या करायला लावत आहे. त्यामुळे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्याकरीता संसर्ग झालेल्याना शोधण्यासाठी मुंबई महापालिका अँटीजेन चाचणी सर्वत्र मोफत करत आहे. या शिवाय महापालिकेने अनेक रुग्णालय आदी ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्यासुद्धा मोफत करून देण्याची सुविधा उलपब्ध केलेली आहे. परंतु मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना मात्र महापालिकेचे कर्मचारी तेथे तैनात असलेल्या खासगी लाईफनीटी वेलनेस इंटरनेशनल लिमिटेड ह्या लॅब करून सक्तीची चाचणी करून घेण्यासाठी भाग पाडत आहेत. विमानतळावर येणाऱ्या मुंबईसह अन्य राज्यातील नागरिकांना सुद्धा बळजबरीने ८५० रुपये भरून चाचणी करण्यास भाग पडले जात आहे.

विमानतळावर देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा कोरोना चाचणी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केली जात आहे. त्यामुळे विमानतळावर उपस्थित असणाऱ्या खासगी लॅबकडूनच तुम्हाला चाचणी करून घ्यावी लागेल अन्यथा बाहेर सोडणार नाही असे थेट धमकावले जाते. येथे पालिकेचे कर्मचारी आदी तैनात केलेले आहेत. ८५० रुपये चाचणी साठी देण्यास प्रवाशी इच्छुक नसले तरी नाईलाजाने अडवून ठेऊ नये म्हणून प्रवासी पैसे भरून चाचण्या करून घेत आहेत. मुंबई विमानतळावर सुरु असलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

प्रवासी चाचणी करून घेण्यास तयार असले तरी त्यासाठी खासगी लॅबला ८५० रुपये का भरावे ? असा प्रश्न उपस्थित करून महापालिका किंवा शासनानेच मोफत तपासणी ठेवावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. रेल्वे, बस, खासगी वाहनाने रोजचे हजारो लोक मुंबई व राज्यात ये- जा करत आहेत त्यांच्या कोरोना चाचणी केल्या जात नाहीत, पण कोरोना फक्त देशांतर्गत विमानातील प्रवाशांमुळेच येणार आहे का? असा संताप व्यक्त करत प्रवाशांनी महापालिका आणि राज्य सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे.  या प्रकरणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही .

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका