उत्तर प्रदेशमधील कानपूर येथून एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने एका मुलाने आपल्या आजारी आईला घराबाहेर काढले. कुणीतरी वयस्कर महिलेचा जमिनीवर पडलेला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.कानपूर कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे, एका निर्दयी मुलाच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यानंतर आरोपी मुलाने आईचा उपचार करण्याऐवजी बहिणीच्या घराबाहेर रस्ता सोडले. आजारी आईला पाहून मुलगी व जावयानेही त्यांना घरी न ठेवता रस्त्यावर सोडले. यादरम्यान, एका व्यक्तीने वृद्ध महिलेला रस्त्यावर मृत्यूशी झुंज देतानाचा व्हिडिओ बनविला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला. तपासणीनंतर असे आढळले की वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. अशा परिस्थितीत घराच्या कोणत्याही सदस्याने तिला साथ दिली नाही आणि त्याला घराबाहेर काढले.डीसीपी अनूप सिंह यांनी सांगितले की, एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या चादरीत रस्त्यावर पडल्या आणि व्हिडिओची दखल घेत चक्री पोलिसांनी त्या महिलेला तातडीने उपचारासाठी उर्सला रुग्णालयात दाखल केले. जेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासणीनंतर असे दिसून आले की, आजारी आईला आपल्या मुलाला रस्त्यावर सोडले होते. ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह आईला मुलाने काढले घराबाहेर; लेक अन् जावयाने देखील रस्त्यावर सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:50 IST
Coronavirus:पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि वृद्ध महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह आईला मुलाने काढले घराबाहेर; लेक अन् जावयाने देखील रस्त्यावर सोडले
ठळक मुद्देकानपूर कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरातील ही घटना आहे, एका निर्दयी मुलाच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यानंतर आरोपी मुलाने आईचा उपचार करण्याऐवजी बहिणीच्या घराबाहेर रस्ता सोडले.